जयपूर, 29 मे : राजस्थानातील (Rajasthan News) जयपुरमध्ये शनिवारी एकाच घरातील तिन्ही सुनांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह विहिरीत सापडले होते. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. या प्रकरणात तपासादरम्यान नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. या बाबी पाहून तुम्हीही हैराण व्हाल. तीन महिला कालू(27), ममता (23) आणि कमलेश (20 ) सख्ख्या बहिणी होत्या. त्यांचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. त्यावेळी तिघीही अल्पवयीन होत्या. महिलांचे पती निरीक्षर होते आणि दारू पिऊन येत दररोज महिलांना मारहाण करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या बहिणीला तिच्या पतीने खूप मारहाण केली होती. ज्यामुळे तिच्या डोळ्याला जखम झाली होती आणि यासाठी ती रुग्णालयातही गेली होती. दररोज मरण्यापेक्षा एकदाच… शेजारच्यांनी सांगितलं की, महिलांचे पती निरीक्षर आणि दारूडे होते. आणि नियमित हे पत्नीला मारहाण करीत होते. या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी तिघींच्या पतीला अटक केली आहे. तिन्ही बहिणी अभ्यास करून चांगलं आयुष्य जगू इच्छित होते. मात्र दारूडे आणि संशयी पती त्यांना नेहमी त्रास देत होते. यात कालू ही सर्वात मोठी बहीण होती. तिच्या दोन्ही बहिणी गर्भवती होती. त्या दोघींचा याच आठवड्यात डिलिव्हरी होणार होती. त्यापैकी ममताची निवड कॉन्स्टेबल परीक्षेत झाली होती. तर कालू बीएच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती. छोटी बहीण कमलेशचा प्रवेश सेंट्रल विद्यापीठात झाला होता. दारूडे पती पूर्वजांची जमीन विकून चालवत होते घर.. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघीचे पती काहीही काम करीत नव्हते. पूर्वजांची जमीन विकून तिघे दारू पित होते आणि घर चालवत होते. विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेहही सापडले होते. हे सर्वजण 25 मे पासून बेपत्ता होते. ज्यानंतर महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही वारंवार घरात महिलांना मारहाण केली जात होती. 15 दिवसांपूर्वीही मोठ्या बहिणीला खूप मारहाण झाली होती.