मुंबई, 19 जून : नववीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. 15 वर्षांच्या या विद्यार्थ्याने ऑनलाइन कोडिंग क्लासदरम्यान महिला शिक्षिकेला प्रायव्हेट पार्ट दाखविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी एक सैन्य अधिकाऱ्याचा मुलगा आहे आणि त्याला कम्युटरची चांगली माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये दिल्यानुसार, 15 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत ई-कोडिंग क्लासदरम्यान विद्यार्थ्याने अनेकदा अशा प्रकराचं कृत्य केलं आहे. मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीसह विद्यार्थी क्लास जॉइन करतात. आरोपी विद्यार्थ्याच्या या कृत्यामुळे शिक्षिका ऑनलाइन क्लास बंद करण्याचा विचार करीत होती. शिक्षिकेने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. सर्विलान्सवरुन माहिती मिळाली की, आरोपी विद्यार्थी राजस्थानमध्ये आहे. यानंतर गेल्या महिन्यात पोलिसांनी टीमला राजस्थानमध्ये पाठवलं होतं. अनेक प्रयत्न करुनही विद्यार्थी तावडीत सापडत नव्हता, कारण त्याचं लोकेशन बदललं होतं. पोलीस राजस्थानमध्येच होते आणि यादरम्यान 30 मे रोजी पुन्हा विद्यार्थ्याने असच कृत्य केलं. यानंतर मात्र त्याचं लोकेशन सापडलं. तो राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सापडला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. हे ही वाचा- ‘लग्न’वाल्या बाबाचा प्रताप; आधीच 5 लग्न, सहाव्याची तयारी, 32 तरुणींसोबत चॅटिंग पोलिसांनी जेव्हा त्याचा लॅपटॉप तपासला तेव्हा लक्षात आलं की, त्याने कम्प्युटरमध्ये सेंटिग बदलली होती. त्यामुळे त्याचा आयपी अड्रेस ट्रॅक करण्यात अडथळा येत होता. ऑनलाइन क्लासदरम्यान तो कॅमेऱ्यात चेहरा येऊ देत नव्हता. मात्र शिक्षिकेने त्याच्या बॅकग्राऊंडचा स्क्रीनशॉट घेतला होता. या फोटोमुळे विद्यार्थ्याचा शोध घेणं सोपं झालं. तपासादरम्यान जेव्हा विद्यार्थ्याला या घटनेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, तो मजेसाठी असं करीत होता. ज्या दोन महिला शिक्षिकांसोबत तो असं कृत्य करीत होता, त्यापैकी एक मुंबईत राहत होती, तर दुसरी शिक्षिका देशातील दुसऱ्या भागात राहत होती. या प्रकारानंतर विद्यार्थ्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि निरीक्षणाखाली पाठविण्यात आलं आहे.