JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आमदाराने निवडणुकीसाठी जमलेल्यांना कारने चिरडलं; तब्बल 23 जणं जबर जखमी

आमदाराने निवडणुकीसाठी जमलेल्यांना कारने चिरडलं; तब्बल 23 जणं जबर जखमी

या दुर्घटनेत विविध राजकीय पक्षाचे तब्बल 15 समर्थकदेखील जखमी झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुवनेश्वर, 12 मार्च : ओडिसाच्या चिलिका विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे (बीजद) निलंबित आमदार प्रशांत जगदेवने निवडणुकीसाठी जमा झालेल्या गर्दीवर आपली गाडी चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तब्बल 23 जणं जखमी झाले आहेत. ज्यात ड्यूटीवर तैनात एक महिला पोलिसांसह 7 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या अपघातानंतर रागाच्या भरात लोकांनी आमदाराच्या गाडीचं नुकसान केलं आहे. सोबतच आमदाराला मारहाण केली. तैनात 7 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य 23 जणं जखमी.. खुर्दा जिल्ह्याच्या बनपूर ब्लॉकमध्ये चेअरमॅन निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांसह तब्बल 500-600 लोक एकत्र होते. त्या दरम्यान आमदार जगदेव ब्लॉक पोहोचले आणि गाडीने समोरील गर्दीतील लोकांना चिरडून पुढे निघून गेले. ज्यामुळे ड्यूटीवर तैनात 7 पोलीस कर्मचाख्यांसह अन्य 23 जणं जखमी झाले आहेत. हे ही वाचा- झोपडपट्टीत अग्नितांडव; 7 जणांचा होरपळून मृत्यू तर 60 हून अधिक झोपड्या जळून खाक जनतेने विधायकाला मारहाण केली.. या अपघातानंतर घटनास्थळावरील रागावलेल्या लोकांनी आमदाराच्या गाडीचं नुकसान केलं. सोबतच झालेल्या गोंधळादरम्यान लोकांनी आमदारालाही मारहाण केली. ज्यात ते जखमी झाले. आमदारांसह अन्य जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य राजकीय पक्षाचे तब्बल 15 समर्थक जखमी.. मीडियाशी बातचीतमध्ये खुर्दा जिल्ह्याचे एसपी आलेख चंद्र पाढी यांनी सांगितलं की, या अपघातात 7 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ज्यात बनपूर पोलिस ठाण्याचे अधिकारीही सामील आहेत. या दुर्घटनेत विविध राजकीय पक्षाचे तब्बल 15 समर्थकदेखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लोकांनी आमदाराला मारहाण केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या