भोपाळ, 8 मे : 1992 बॅचचे मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh News) एका निवृत्त IAS अधिकारीवर त्यांच्याच सुनेने बलात्काचा (Attempt to Repe ) प्रयत्न आरोप केला आहे. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचलं असून त्यावर सुनावणी सुरू आहे. IAS अधिकारीची पत्नी आणि मुलावरही सुनेने हुंड्यासाठी छळ करीत असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय तिला बांधून मारहाण केली जात असल्याचं तिने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी निवृत्त झालेल्या IAS अधिकाऱ्यांनी आपल्या मुलाचं लग्न माझ्यासोबत लावून दिलं होतं. मात्र पती शारिरीक अक्षम आहे. हे माझ्यापासून लपवण्यात आलं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने खोलीबाहेर काढलं. तिने सासऱ्याला याबाबत सांगितलं तर ते म्हणाले, की माझ्यासोबत खोलीत चल मी सर्व ठीक करेन. सासऱ्याने शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिला तर मला मारहाण केली. तिने पतीकडे याबाबत तक्रार केली तर त्यानेही वडिलांनाच साथ दिली. हे ही वाचा- धक्कादायक! ऑर्डर केलेल्या पराठ्यामध्ये आढळली सापाची कात, हॉटेलवर कारवाई लग्नाच्या दोन दिवसांनंतर माझ्याकडून 7 लाख कॅश आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी केली. दररोज मला मारहाण करीत होते. जेवणही देत नव्हते. कधी काही देत जरी होते ते शिळ असायचं. मी माहेरी याबाबत सांगितलं. यानंतर भाऊ मला घेण्यासाठी आला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी आम्हाला घराबाहेर काढलं. या प्रकरणात एसपींनी सांगितलं की, दोन्ही पक्षांच्या आरोपांचा तपास सुरू आहे. पीडितेने आरोपींवर हुंड्यासाठी छळ, शारिरीक आणि मानसिक शोषण या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे सासरच्यांचं म्हणणं आहे की, लग्नाचं सर्व खर्च त्यांनीच केला होता. अशात ते हुंडा का मागतील?