JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पत्नी बारमध्ये करायची काम, पतीचा संशय ठरला खरा अन्… ठाण्यातील धक्कादायक प्रकार

पत्नी बारमध्ये करायची काम, पतीचा संशय ठरला खरा अन्… ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती जिथे काम करत होती त्यावरून पती नाराज होत पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विविधा सिंग(ठाणे),14 एप्रिल : ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती जिथे काम करत होती त्यावरून पती  नाराज होत पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या मानेला आणि पोटात गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची पत्नी बारमध्ये काम करते. दरम्यान तिच्या पतीला हा व्यवसाय अजिबात आवडत नाही. यावरून घरातील अल्पवयीन मुलीसमोर महिलेला भेटण्यासाठी अनेक लोक येत होते. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील लोकमान्य नगर भागात पती पत्नीसह दोन मुली राहतात. हल्ला केलेला व्यक्ती हा चित्रकार आहे. परंतु त्यांच्याकडे नोकरी नसल्याने तो निराश आहे. यामुळे पत्नीवर काम करण्याची वेळ आली होती. म्हणून ती ठाणे आणि आसपासच्या काही बारमध्ये ही महिला कलाकार म्हणून काम करायची.

संबंधित बातम्या

या महिलेचा व्यवसाय सुरू ठेवण्यास पतीने आक्षेप घेतला होता. यामुळे अनेकदा काही तरूण तिच्या घरी येत चौकशी करू लागले. याकारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले.

गडकरींच्या धमकीमागं आरएसएस कनेक्शन; पुजारीच्या दाव्यानं खळबळ

दरम्यान या दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झालं. यासंदर्भात पत्नीने पोलिसांत धाव घेत पतीविरूद्ध तक्रार दिली. या महिलेने कुटुंबातील मी एकमेव कमावती सदस्य असल्याचा दावा करत पतीवर आरोप केले. यामुळे संतापलेल्या पतीने स्वयंपाकघरातील चाकू उचलून पत्नीवर वार केला. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या