JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / सरकारी नोकरीसाठी केली आई-वडील, आजीची हत्या; सॅनिटायजर अन् लाकडं वापरून घरात जाळत राहिला डेडबॉडी

सरकारी नोकरीसाठी केली आई-वडील, आजीची हत्या; सॅनिटायजर अन् लाकडं वापरून घरात जाळत राहिला डेडबॉडी

आपले जन्मदाते आईवडिल आणि आजी यांचा जीव घेण्याइतपत या तरुणावर कोणता प्रसंग उद्भवला?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायपूर, 19 मे : छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील सिघोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुटका गावात एका युवकानं त्याच्या आई-वडिलांसह आजीचा खून केलाय. हा धक्कादायक प्रकार का घडला असावा अशी चर्चा परिसरात आहे. आपले जन्मदाते आईवडिल आणि आजी यांचा जीव घेण्याइतपत या तरुणावर कोणता प्रसंग उद्भवला होता याबाबतही तपास सुरू आहे. छत्तीसगड पोलिसांनी एका युवकाला त्याची आई, वडील आणि आजीच्या हत्येप्रकरणी अटक केलीय. आरोपी युवकानं तिघांनाही हॉकी स्टीकने मारलं आणि सॅनिटायझर टाकून मृतदेह जाळूले त्यानंतर ते घरात पुरले. आरोपीचे वडील उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक होते. चांगलं चाललेलं आयुष्य उद्धवस्त करण्यामागे तरुणाचा काय उद्देश होता हे लक्षात आलं नाही. पण हे असं कारण होतं की वडिलांना मारल्यावर आई आणि आजीला जिवंत ठेवलं असतं तर अडचण निर्माण झाली असती असं त्याला वाटत होतं. नेमका काय आहे प्रकार? पुटका येथील रहिवासी प्रभात भोई हे एका शाळेत शिक्षक होते. ते पत्नी सुलोचना व आई झरना भोई यांच्या समवेत राहत होते. प्रभात यांना दोन मुलं आहेत. मोठा उदित आणि लहान अमित. अमित रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करतो. तर, उदित हा बेरोजगार होता, व तो वडिलांकडेच राहत होता. उदितने पैशांसाठी व वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वाअंतर्गत नोकरी मिळावी यासाठी, त्याची आई सुलोचना, वडील प्रभात व आजी झरना या तिघांचा खून केला. तिघेही रात्री झोपले असताना त्यांच्यावर हॉकी स्टीकने वार करून उदितने त्यांना मारून टाकलं. खून केल्यानंतर तिघांचे मृतदेह घरी लपवून ठेवले. तिन्ही मृतदेहांना सॅनिटायझर टाकून जाळलं. तसंच 12 मे 2023 रोजी आई-वडील आणि आजी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. 8 मे 2023 रोजी तिघेही उपचारांसाठी रायपूरला गेले होते. तेथून अद्याप आले नाही, अशी तक्रार त्याने दिली होती. ‘ तोंड उघडलंस तर जीव घेईन’, 10 वीच्या विद्यार्थिनीला फरफटत नेलं, मनसुन्न करणारी घटना असा झाला खुनाचा उलगडा लहान मुलगा अमितला आई-वडील व आजी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तो पुटका येथे आला. या वेळी त्याला घराच्या मागच्या भागात जळल्याचे अवशेष सापडले. राख बाजूला केल्यानंतर त्याला मानवी हाडं दिसली. घराची तपासणी केली असता रक्ताचे डाग दिसले. खड्ड्यातून राखही सापडली. त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना उदितने खून केल्याचा संशय आला. उदितकडे पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी उदितकडून हॉकी स्टीक व गुन्हा करताना वापरलेले इतर साहित्य जप्त केलं असून, पुढील तपास सुरू आहे. याबाबत पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी सांगितलं की,‘घटनास्थळी जेव्हा पोलीस घराच्या आत गेले, तेव्हा राखेमध्ये मानवी अवशेष आढळून आले. तेथेच रक्ताचे डाग आणि जळण्याच्या खुणा आढळल्या, आरोपी उदितची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. आरोपीने सांगितलं की, 7 मे 2023 रोजी पैशांवरून भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने रात्री तिघांचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या