JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / झोपलेल्या वडिलांचा मुलाने केला खून; म्हणाला, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतमध्ये पाठवलं

झोपलेल्या वडिलांचा मुलाने केला खून; म्हणाला, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतमध्ये पाठवलं

झोपेत असलेल्या वडिलांच्या (Son kills father and claimed to send him to jannat) डोक्यात जोरदार प्रहार करत मुलानेच त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजस्थान, 30 ऑक्टोबर : झोपेत असलेल्या वडिलांच्या (Son kills father and claimed to send him to jannat) डोक्यात जोरदार प्रहार करत मुलानेच त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले वडील (Son killed sleeping father) अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांना आपण जन्नतमध्ये पाठवलं, असा दावा या मुलाने पोलिसांकडे केला आहे. झोपेत असलेल्या स्वतःच्याच बापाला ठार करणाऱ्या या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांचा झोपेत खून राजस्थानच्या सवाई माधोपूर भागात इब्राहिम नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्यासोबत मोठा मुलगा अमिमुद्दीन आणि छोटा मुलगा कुतुबुद्दिनह राहत होते. घटनेच्या दिवशी अमिमुद्दीन काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. दुपारी 2.30 वाजण्याया सुमाराला इब्राहिम घरातच झोपले होते. त्यावेळी कुतुबुद्दिन काठी घेत त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. या हल्ल्यामुळे इब्राहिम जोरदार किंचाळले. त्यांची किंकाळी ऐकून शेजारी धावत घरी आले. इब्राहिम रक्ताच्या थारोळ्यातब कुतुबुद्दिननं डोक्यात केलेले घाव गंभीर होते. कुतुबुद्दिन यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ते बेशुद्ध झाले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची कल्पना देत इब्राहिम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर स्थानिक रुग्णालयाने इब्राहिम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना राजधानी जयपूरला नेण्याचा सल्ला दिला मात्र जयपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा-  जमिनीसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मुलगा आणि दीरानेही दिली साथ मुलाने सांगितले अजब कारण आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतरही कुतुबुद्दिन घऱात थंडपणे बसून होता. त्याने पोलिसांना सांगितलेले कारण ऐकून पोलीसही चक्रावले. आपले वडील त्रासात होते. त्यामुळे त्यांना जन्नतला पाठवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं कुतुबुद्दिननं सांगितलं. वडिलांना जन्नतमध्ये पाठवा, असा आपल्याला वरूनच साक्षात्कार झाला होता. त्याचं आण पालन केलं, अशं तो म्हणाला. वडिलांच्या मृत्यूचं कुठलंही दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. पोलिसांनी कुतुबुद्दिनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या