JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने मुलगा झाला राक्षस , अक्षरश: तुकडे करत आईची केली हत्या, नंतर..

ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने मुलगा झाला राक्षस , अक्षरश: तुकडे करत आईची केली हत्या, नंतर..

एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईसोबत धक्कादायक कांड केले.

जाहिरात

मृत महिला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

एस. सिंह, प्रतिनिधी चंडीगढ, 3 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. पंजाब राज्यातील पटियाळाच्या पंताडा येथील कांगथला गावात ही धक्कादायक घटना घडली. ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने एका नशाखोराने त्याच्या मित्रांसह आईची निर्घृण हत्या केली. आरोपी मुलाने धारदार शस्त्राने आईच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि घराबाहेर तिला जाळले. परमजीत कौर (50) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपींमध्ये परमजीत कौरचा मोठा मुलगा गुरविंदर सिंग उर्फ ​​गिंडा (28) आणि त्याचे दोन मित्र राजिंदर सिंग उर्फ ​​राजा आणि रणजित सिंग उर्फ ​​राणा यांचा समावेश आहे.

शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या आईने ड्रग्जसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी गुरविंदर सिंगने तिची हत्या केली. तर पांतडा पोलीस स्टेशनचे अधिकारी मनप्रीत सिंग यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपी आणि त्याला हत्येमध्ये मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमने घरून नमुनेही घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृताच्या मामेभाऊ भगवान सिंहने सांगितले की, गुरविंदरने विधवा परमजीत कौरची हत्या केली आणि हा गुन्हा लपवण्यासाठी रॉकेल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या त्याचा सावत्र भाऊ जसविंदर (20) याचीही आरोपींनी हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी जसविंदरचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला. मृतदेहावर कोणीही हक्क सांगितला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व प्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या