विपिन कुमार दास (दरभंगा), 06 एप्रिल : बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलाने चाकूने वार करून आईची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सासू-सून यांच्यातील किरकोळ भांडणाला कंटाळून तो मुंबईहून परतला पत्नीच्या सांगण्यावरून आईची हत्या केली.
दरभंगा जिल्ह्यातील निस्ता गावात ही घटना घडली आहे. आरोपी मोहम्मद इफ्तिखार ही मुंबईत राहत असूनन मजुरीचे काम करायचा. तो स्वतः परराज्यात राहत असला तरी त्याची पत्नी व मुले गावातच राहत होती. अनेकदा सासू-सुनेमध्ये घरगुती भांडणे होत असत. ज्याची माहिती इफ्तिखारची पत्नी फोनवरून देत होती. दुसरीकडे सासू-सुनेच्या रोजच्या भांडणाला कंटाळून इफ्तिखार घरी परतला आणि घरात आई न दिसल्याने तो शेतात गेला.
आई आपल्या शेतातील गव्हाची कापणी करत होत. आईला पाहताच आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला इतका जोरात होता की महिलेचे पोट फुटले. दरम्यान शेजारी असणाऱ्या लोकांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तीला मृत घोषीत केल्याचे सांगण्यात आलं. मुलावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अंमली पदार्थांचा व्यसनी आहे आणि मुंबईत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक दिवसांपासून मजुरीचे काम करतो. पण घरात एक रुपयाही देत नाही. मी एकटा असूनही त्याची बायको आणि मुलांची काळजी घेतो. पण त्याचा एक रुपयाही फायदा होत नाही. पत्नीच्या सांगण्यावरू मुंबईहून परतला आणि घरी येताच त्याने आईला चाकूने वार करून हत्या केल्याची खंत वडिलांनी केली.
दरभंगाचे शहर एएसपी सागर कुमार झा म्हणाले की, आतापर्यंत कौटुंबिक कारणावरून हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्याचबरोबर हत्येत वापरलेला चाकू शेजारील तलावातून जप्त करण्यात आला आहे. आरोपीलाही अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.