JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आईच्या डोक्यात हातोड्यानं 14 वेळा वार; घरातच मृतदेहासोबत काढले 2 महिने, कारण जाणून पोलिसही हादरले

आईच्या डोक्यात हातोड्यानं 14 वेळा वार; घरातच मृतदेहासोबत काढले 2 महिने, कारण जाणून पोलिसही हादरले

डेल मॉर्गन यानं बेडरूममध्येच आपल्या आईची हातोड्यानं ठेचून निर्घृण हत्या (Son Killed his Mother) केली. यानंतर दोन महिने तो घरातच आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहात होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : एका मुलानं आपल्या आईसोबत जे केलं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. UK च्या पेम्ब्रॉक डॉक टाउनमध्ये राहणाऱ्या डेल मॉर्गन यानं बेडरूममध्येच आपल्या आईची हातोड्यानं ठेचून निर्घृण हत्या (Son Killed his Mother) केली. यानंतर दोन महिने तो घरातच आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहात होता. डेल मॉर्गनला शेजाऱ्यांनी जेव्हा विचारलं, की तुझी आई कुठे आहे, तेव्हा तो सांगत असे की कोरोनामुळे (Coronavirus) ती आयसोलेशनमध्ये **(Isolation)**आहे. साहेब, मी आत्ताच डबल मर्डर केलाय! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला लोकांना संशय येऊ नये यासाठी तो आपल्या आईच्या नंबरवर मेसेजही पाठवत असे. मात्र, बरेच दिवस त्याची आई घरी न दिसल्यानं लोकांनी पोलिसांना (Police) माहिती दिली. यानंतर २० फेब्रुवारीला पोलिसांची टीम मॉर्गनच्या घरी पोहोचली. तपासणी सुरू असताना पोलिसांना बेडरूमची एका छोटी खिडकी उघडी दिसली. अधिकाऱ्यांनी जेव्हा खिडकीचा पडदा बाजूला केला तेव्हा त्यांना धक्का बसला. रूममध्ये रक्ताचे डाग दिसले आणि बेडवर मृतदेह दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा जूडिथ रहेड यांच्या डोक्यावर एक प्लॅस्टिक पिशवी बांधल्याचं आढळून आलं. शवविच्छेदन अहवालात समोर आलं, की त्यांच्या डोक्याच्या चारही बाजूंनी फ्रॅक्चर आहे. डोक्यात 14 घाव होते. पोलिसांनी चौकशी केली असता मॉर्गननं मान्य केलं की त्यानेच आपल्या आईच्या डोक्यावर हातोड्यानं वार करत तिचा जीव घेतला. यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी तो मृतदेहासोबतच घरात राहू लागला. एका बिडीसाठी महिलेचा भर रस्त्यात खून, नशेबाज आरोपीला अटक; पाहा VIDEO The Sun च्या रिपोर्टनुसार, पोलीस चौकशीत आरोपीनं सांगितलं, की त्याला नशा करण्याची सवय लागली होती. यामुळे तो घरातूनच पैसे चोरत असे. त्यानं आपल्या आईच्या बँक खात्यातून 11 वेळा पैसे ट्रान्सफर केले होते. आईनं जेव्हा यासाठी विरोध केला तेव्हा त्यानं आईवर हातोड्यानं वार करत तिचा जीव घेतला. न्यायालयानं मॉर्गन याला आईच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या