मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

साहेब, मी आत्ताच डबल मर्डर केलाय! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला, पोलिसही चक्रावले

साहेब, मी आत्ताच डबल मर्डर केलाय! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला, पोलिसही चक्रावले

आपण दोघांचा खून केला असून आपल्याला (a woman enters police station confessing double murder) अटक करा, अशी मागणी करत मध्यरात्री एक महिला पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला

  • Published by:  desk news

रायपूर, 4 ऑक्टोबर : आपण दोघांचा खून केला असून आपल्याला (a woman enters police station confessing double murder) अटक करा, अशी मागणी करत मध्यरात्री एक महिला पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. महिलेनं आणि तिच्या पतीनं दोघांचा (Murder of 2 persons) खून करून त्यांचे मृतदेह घरात ठेवले होते. महिलेच्या पतीने त्याच्या सख्ख्या भावाचा (Man murders his brother and his wife) आणि वहिनीचा खून केला. आपला भाऊ जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून आरोपीने भाऊ आणि वहिनीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्याच्या पत्नीनेही त्याला यात साथ दिली.

असा केला खून

छत्तीसगडमधील जशपूर भागातील एका गावात मोठा भाऊ मथनू राम आणि त्यांची पत्नी गंगोत्री बाई राहत होते. त्यांच्याच समोर बुधमन भगत आणि त्याची पत्नी सुंदरीबाई राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी बुधमन मथनू यांच्या घरात कुऱ्हाड घेऊन घुसला. मथनूला काहीही उत्तर न देता थेट त्याने कुऱ्हाडीचा वार करून त्याची हत्या केली. या घटनेने घाबरलेल्या गंगोत्री बाईंनी घराबाहेर धाव घेत आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर बुधमननं तिचा पाठलाग करत कुऱ्हाडीचा वार करून त्यांचाही खून केला. पती आणि पत्नी या दोघांचेही मृतदेह काही अंतरावर पडलेले होते.

जादूटोण्याचा संशय

आपला भाऊ आणि वहिनी जादूटोणा आणि काळी जादू करत असल्याचा संशय बुधमन आणि त्याच्या पत्नीला होता. काही दिवसांपूर्वी बुधमनच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आपल्या भावाने जादूटोणा केल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय बुधमन आणि त्याच्या पत्नीला होता. या रागातून बुधमनने भाऊ मथनू आणि वहिनी गंगोत्रीबाईंवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली.

हे वाचा - चीनमधील BUSINESS DRINK ची दलदल, कॉर्पोरेट शिष्टाचाराच्या नावाखाली बलात्कार

पोलिसांनी बुधमन आणि त्याची पत्नी सुंदरीबाईला अटक केली आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Brother murder, Chattisgarh, Crime