श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला
नवी दिल्ली, 9 मे : आपल्या लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हत्या आणि तिच्या शरीराचे तुकडे करणारा आरोपी आफताब अमील पूनावाला याच्या विरोधात मंगळवारी दिल्लीच्या साकेत कोर्टाने आरोप निश्चिती केली आहे. न्यायालयाने आफताबवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत कलम 302 (हत्या) आणि कलम 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. यापुढे आफताब पुनावालाला हत्येच्या आरोपाखाली सुनावणीला सामोरं जावं लागेल. साकेत कोर्टाने सांगितल्यानुसार, सर्व बाजू पाहता दिल्ली पोलिसांनी पुरेसे पुरावे सादर केले असून प्राथमिक पातळीवर आफताबविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुराव्यांअभावी आफताबची सुटका होण्याची चर्चा होत असताना ही मोठी अपडेट मानली जात आहे.
12 नोव्हेंबर 2022 मध्ये आफताब पुनावाला याला दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीच्या महरोली भागातून अटक केली होती. याच फ्लॅटमध्ये आफताबने आपली गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या केली होती आणि तिचे तुकडे केले होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाचा गळा दाबून हत्या केली होती आणि तिच्या शरीराचे 35 तुकड़े करून घरातील 300 लिटर फ्रिजमध्ये तब्बल 3 आठवड्यांपर्यंत ठेवले होते. दरम्यानच्या काळात तो फ्रिजमधील तुकडे रात्रीच्या वेळी बाहेर फेकून येत होता.
21 वर्षांच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूने हादरलं होतं पुणे; 350 व्यक्तींची चौकशी करूनही मृत्यूचं गूढ कायमपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये आर्थिक कारणावरुन वारंवार भांडण होत होतं. या भांडणातच आफताबने 18 मेच्या सायंकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केल्याची शक्यता आहे. श्रद्धा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहत होती. बम्बल या डेटिंग अॅपच्या माध्यमातून मुंबईत या दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर त्यांनी मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम सुरू केलं आणि दोघेही प्रेमात पडले. यानंतर ते दिल्लीला गेले होते.