श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात नवीन अपडेट
नवी दिल्ली 14 जानेवारी : दिल्लीतील मेहरौली येथे झालेल्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी श्रद्धा वालकरच्या 23 हाडांचे पोस्टमार्टम विश्लेषण केले आहे. मंगळवारी दिल्ली एम्समध्ये केलेल्या पोस्टमॉर्टम विश्लेषणात हाडे करवतीने कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली पोलीस या प्रकरणी साकेतमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करू शकतात. अंधश्रद्धेतून धक्कादायक कांड; अल्पवयीन मुलाचं शीर धडावेगळं करून मृतदेहाचे तुकडे केले, असा झाला खुलासा श्रद्धाच्या हत्येचा आरोपी आफताब सध्या तिहार तुरुंगात आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली आहे. यापूर्वी त्याला पॉलीग्राफ चाचणीलाही सामोरे जावं लागलं होतं. पोलीस चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचं सांगितलं होतं. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितलं होतं की, 18 मे रोजी त्याचं श्रद्धासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. 2 मुलांची आई असलेल्या विवाहित प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला अल्पवयीन मुलगा, गावकऱ्यांनी केलं भलतंच कांड श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. आफताबला पोलिसांनी १२ नोव्हेंबरला अटक केली होती.