मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /2 मुलांची आई असलेल्या विवाहित प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला अल्पवयीन मुलगा, गावकऱ्यांनी केलं भलतंच कांड

2 मुलांची आई असलेल्या विवाहित प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला अल्पवयीन मुलगा, गावकऱ्यांनी केलं भलतंच कांड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या अल्पवयीन मुलाचे गावातच राहणाऱ्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. तिला दोन मुलं आहेत. गावकऱ्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Bihar, India

  पाटणा 12 जानेवारी : बिहारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटणं एका अल्पवयीन मुलाला चांगलंच महागात पडलंय. मधेपुरा येथे गावकऱ्यांनी एका अल्पवयीन प्रियकराला उलटं टांगून संपूर्ण गावात त्याची धिंड काढली. त्यानंतर त्याला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. या अल्पवयीन मुलाचे गावातच राहणाऱ्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. तिला दोन मुलं आहेत. गावकऱ्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं. यानंतर दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

  या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. मधेपुरा इथं घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गावकऱ्यांनी अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून त्याला खांबाला उलटं लटकवलं आणि त्या अवस्थेत त्याला गावभर फिरवून दोन मुलांच्या आईसोबत त्याचं लग्न लावून दिलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी हे कृत्य केले.

  'प्रेयसीचं भूत मला सतावतं..'; घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा

  ही घटना चौसा ब्लॉक अंतर्गत रसालपूर धुरिया पंचायतीच्या श्याम टोला इथं घडली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे 25 वर्षीय महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. या मुलाला गावकऱ्यांनी मुलीच्या घरी पकडल्याचं म्हटलं जातंय. सर्वात आधी गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली, नंतर त्याला अर्धनग्न करण्यात आलं, त्याचे हात पाय बांधले आणि त्याला काठीला उलटं टांगण्यात आलं, मग संपूर्ण गावात त्याला फिरवण्यात आलं. अल्पवयीन मुलगा हा पुरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकदमपूर गावातील असल्याचं म्हटलं जात आहे.

  रविवारी सकाळी या प्रेमी युगुलाला गावकऱ्यांनी पकडलं, त्यानंतर सोमवारी ग्रामपंचायतीची बैठक झाली, तिथं दोघांना बोलावून त्यांचा लग्नाला सहमती देण्यात आली. मंगळवारी दोघांचे गावातीलच मंदिरात लग्न लावून दिले. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  पत्नी TV पाहण्यात दंग, पती बाथरूममध्ये गेला अन्....धक्कादायक प्रकार

  ती महिला विधवा असून दोन मुलांची आई असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या पतीला व्यसन होतं आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचं या अल्पवयीन मुलाशी सूत जुळलं होतं. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आली नाही. तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

  First published:

  Tags: Crime news, Love story