मुंबई, 25 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Deth case ) प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रा एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे (NIA) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रं एनआयएकडे सोपवण्यात आले असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन यांना कळवाच्या खाडीत फेकून देण्यात आले होते, असा खुलासा झाला आहे. निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे (Vinayak Shinde) याने मनसुख हिरेन यांना ठाण्यातील घोडबंदर रोड इथं फोन करून बोलावले होते. यावेळी त्याने तावडे नावाच्या पोलिसाच्या नावाने मनसुख यांना फोन केला होता. तावडे हे मुंबईत सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते. गाड्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अटकेच्या भीतीने एकाची आत्महत्या मनसुख यांना फोन करण्यासाठी विनायक शिंदे यांने बनावट सिमकार्डचा वापर केला होता. हे सिमकार्ड गुजरात येथील एका मित्राकडून मागवण्यात आले होते. एकूण 14 सिमकार्ड होते, त्यापैकी एक सिमकार्ड विनायक शिंदेनं वापरलं. मनसुख हिरेन ठाण्यात पोहोचल्यानंतर गाडीतच बेशुद्ध करण्यात आलं होतं. त्यांचं तोंड झाकण्यासाठी विनायक शिंदे याने अनेक रुमालाच वापर केला होता. याच रुमालाचा त्याने दोरी म्हणून सुद्धा वापर केला होता. आता आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार? काय म्हणाले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार त्यानंतर हिरेन यांना कळवा खाडीत टाकण्यात आले. मिळालेल्या अहवालानुसार, हिरेन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पण जेव्हा त्यांना खाडीत ढकलण्यात आले होते, तेव्हा ते जिवंत होते. खाडीत टाकण्यापूर्वी विनायक शिंदेनं सोन्याची अंगठी, साखळी आणि मनसुख हिरेन घातलेली महागडी घडी काढून घेतली होती. हा सर्व एपीआय सचिन वाझे यांच्या आदेशानुसार करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण कट सोबू हॉटेलमध्ये रचला होता. या प्रकरणात शिंदेनं आणखी लोकांची मदत घेतली असावी असा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. आनंद महिंद्रा यांची वचनपूर्ती; भारताच्या विजयानंतर घातला या खेळाडूसारखा गॉगल मनसुख हिरेन यांची हत्या का करण्यात आली असावी, याचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. मनसुख हिरेन यांचा जिलेटिन ठेवलेल्या कार प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास आता एनआयएची टीम करत आहे.