IND vs ENG : आनंद महिंद्रा यांची वचनपूर्ती; भारताच्या विजयानंतर घातला या खेळाडूसारखा गॉगल

IND vs ENG : आनंद महिंद्रा यांची वचनपूर्ती; भारताच्या विजयानंतर घातला या खेळाडूसारखा गॉगल

महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग (Mahindra and Mahindra Group) समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा(Anand Mahindra)नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटरवर(Twitter)नेहमी आपल्या पोस्टस, प्रतिक्रियांमुळे ते चर्चेत असतात.

  • Share this:

पुणे, 25 मार्च : महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग (Mahindra and Mahindra Group) समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा(Anand Mahindra)नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटरवर(Twitter)नेहमी आपल्या पोस्टस, प्रतिक्रियांमुळे ते चर्चेत असतात. कुठे चांगला शोध लागला, कधी कोणी चांगले काम केलं, एखादी महत्वाची घटना घडली, तर ते आवर्जून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यांच्या मार्मिक टिप्पण्यामुळे ते ट्विटरवर लोकप्रिय आहेत. सध्या त्यांचा एक विशिष्ट गॉगल(Goggle)घालून काढलेला सेल्फी व्हायरल झाला आहे.

या फोटोत त्यांनी काळ्या आणि फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा गॉगल घातला असून, बोटांनी ते व्ही फॉर व्हिक्टरी ही विजयाची खूण करत असताना दिसत आहेत. हा तोच गॉगल ज्याच्याबद्दल गेले काही दिवस चर्चा सुरू होती.

भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेल(Axar Patel) यानं असा गॉगल क्रिकेट सामन्यांदरम्यान घातला होता. त्याचे या गॉगलमधील फोटोही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. भारतीय क्रिकेट टीमचे(Indian Cricket Team)चाहते असणाऱ्या आनंद महिंद्रा यांचही लक्ष या गॉगलनं वेधून घेतलं होतं. त्यांनी भारतानं इंग्लंड विरुद्धची टी-20 सीरिज (T-20 Series)जिंकल्यास हा गॉगल घालून सेल्फी शेअर करण्याचं जाहीर केलं होतं. दिल्या वचनाला जागत त्यांनी भारतानं इंग्लंड विरुद्धची टी-20 सीरिज जिंकल्याबरोबर हा अक्षर पटेल फेम गॉगल घालून सेल्फी काढला आणि ट्विटरवर शेअर केला. त्यासोबत ‘एक वचन पूर्ण करायचं आहे. हा आहे अक्षरच्या सनग्लासेस घालून काढलेली सेल्फी, हा गॉगल गुड लक चार्म(Good Luck Charm)ठरला आहे.’ असा संदेशही त्यांनी दिला आहे.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटवर अक्षर पटेलनंही प्रतिक्रिया व्यक्त केली असून, त्यानं म्हटलं आहे की, ‘हे सनग्लासेस(Sunglasses)आपल्याला अगदी शोभून दिसत आहेत. तुम्ही भारतीय संघाला दिलेल्या पाठींब्याबद्दल खूप खूप आभार’. यावर आनंद महिंद्रा यांनी अतिशय मिश्कील उत्तर दिलं आहे. अक्षर पटेलला टॅग करत त्यांनी म्हटलं आहे की, हे सनग्लासेस मला चांगले दिसत आहेत;पण दुर्दैवानं ते मला ती विलक्षण प्रतिभा देणार नाहीत जी तुझ्याकडे आहे.’

सहा भारतीय खेळाडूंना दिली थार भेट

आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघानं मिळवलेल्या कसोटी मालिकेतील (Test Series)विजयाबद्दल संघातील सहा युवा खेळाडूंना महिंद्रा थार(Mahindra Thar SUV)ही एसयूव्ही देण्याची घोषणा केली होती. यामध्ये शुभमन गिल, मोहमद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांचा समावेश होता. याशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या शार्दूल ठाकूर यालाही ही एसयूव्ही भेट मिळणार आहे. आनंद महिंद्रा नेहमीच खेळाडूंचे असे कौतुक करतात.  2017 मध्ये सुपर सिरीज अजिंक्यपद पटकावणारा बॅडमिंटनपटू(Badminton Player)किदान्बी श्रीकांत(Kidambi Shrikant)यालाही त्यांनी टीयुव्ही 300(TUV 300)भेट दिली होती.

First published: March 25, 2021, 8:00 AM IST

ताज्या बातम्या