प्रतिकात्मक फोटो
मुंबई 07 ऑक्टोबर : विरार पूर्वेकडील सरकार नगर संकुलात 5 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या 29 वर्षीय बेजनाथ शर्मा हत्येचं एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात काही तरुण रस्त्याच्या कडेला एकमेकांशी भांडतानाही दिसत आहेत. यानंतर तरुणांची टोळी घटनास्थळावरून पळताना दिसत आहे. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आता विरार पोलिसांना या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यास आणि हत्येचं कारण शोधण्यास मदत होऊ शकेल. दसऱ्यालाच ट्रेनमध्ये राडा, महिलांमध्ये फ्री स्टाईल, तुंबळ हाणामारीचा Video 5 ऑक्टोबर रोजी विरार पूर्वेकडील सरकार नगर परिसरात दोन गटांध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या 29 वर्षीय बेजनाथ शर्मा याच्यावर हल्लेखोराने लोखंडी सळईने वार केले. जखमी बेजनाथ शर्मा याच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. बेजनाथ शर्मा याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी विरार पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. विरार पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना मृताच्या मित्रांनी सांगितलं की, ते माँ दुर्गा मूर्तीचं विसर्जन करून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील पैसे आणि मोबाईल हिसकावून नेला. पीडित तरुण इथून पळ काढत आपल्या परिसरात पोहोचले तेव्हा तिथे बेजनाथ शर्मा आणि त्याचे काही मित्र दिसले. तरुणांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिल्यावर बेजनाथ आणि त्याच्या मित्रांनी निर्णय घेतला की घटनास्थळी जाऊन याची माहिती घ्यायची की इतक्या रात्री हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला. ठाण्यात महिलेसोबत भर रस्त्यावर जोरदार मारहाण, पाहा VIDEO बेजनाथ शर्मा आपल्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या आरोपींनी त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. ज्यामध्ये बेजनाथ शर्मा गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.