ओडिसा, 21 ऑक्टोबर : ओडिसाच्या (Odisha News) कालाहांडी जिल्ह्यात एका शाळेच्या शिक्षिकेसोबत बलात्कार केल्यानंतर तिची हत्या (murdered after raping a school teacher) करण्यात आली. काही दिवसांपूर्वी 23 वर्षीय शिक्षिका बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याच्या 11 दिवसांनंतर पोलिसांनी मंगळवारी बांधकाम सुरू असलेल्या शाळेच्या परिसरातून तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह (Teachers Dead body) ताब्यात घेतला. महिलेचं अर्ध शरीर जळालं (Crime News) होतं. या प्रकरणात शाळा समितीच्या अध्यक्षाने शिक्षिकेची हत्या केल्याचा आरोप आहे. बुधवारी त्याला बांगोमुंडामध्ये न्यायालयात हजर करण्यात आलं. आणि पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आलं. यानंतर 14 ऑक्टोबर रोजी तो कोठडीतून फरार झाला. अशात ओडिसा पोलिसांनी त्याच्या अटकेवर 1 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. 10 फूट खाली अर्धवट जळलेला मृतदेह केला दफन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानीपटना आणि केगांवदरम्यान भररस्त्यात 8 ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रेसिडेंटने आपल्या कारमध्ये महिला शिक्षकाची हत्या केली होती. त्याशिवाय तिचा मृतदेह 10 फूट खाली गफन केला होता. आरोपीनेच याची माहिती दिली होती. आरोपीने अंधारात शिक्षिकेचा अर्धवट जळालेला मृतदेह शाळेच्या खेळाच्या मैदानात दफन केला होता. सांगितलं जात आहे की, शिक्षिकेचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला. अशातच आरोपीने गळा आवळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीने शाळेच्या परिसरात जेथे आधीच खड्डा खणून ठेवला होता, तेथे शिक्षिकेला फेकलं आणि दफन केलं. हे ही वाचा- होमवर्क न केल्याने तालिबानी शिक्षा;टीचरने जमिनीवर आपटून विद्यार्थ्याचा घेतला जीव आरोपीचं गूढ झालं होतं माहीत या प्रकरणात हत्या करण्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. शिक्षिकेला आरोपीच्या विवाहबाह्य संबंधांविषय़ी कळालं होतं. त्यामुळे तो शिक्षिकेला नेहमी धारेवर धरत असे. यावेळी शिक्षिकेने त्याचा पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही आरोपीला दिला होता.