नवी दिल्ली 15 मार्च : अनेकदा आयुष्यातील एखादा चुकीचा निर्णय आपल्याच जीवावर बेततो. एक असाच चुकीचा निर्णय रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिने घेतला होता. ज्याची किंमत तिला आपला जीव गमवून मोजावी लागली. ग्रेटा पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आलेली जेव्हा तिने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना सायकोपॅथ म्हणजेच मनोरुग्ण म्हटलं होतं. मात्र तिच्या मृत्यूचं आणि पुतिन यांचं काहीही कनेक्शन नाही (Model who Called Putin Psychopath died).
ग्रेटा वेडलरनं पुतिन यांना सायकोपॅथ म्हटल्यानं ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं तिच्या मृत्य़ूशी काहीही कनेक्शन नाही. ग्रेटाच्या मृत्यूचं कारण तिचा एक्स बॉयफ्रेंड होता (Boyfriend killed Russian Model). ज्याने काहीतरी वाद झाल्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली. 23 वर्षाच्या ग्रेटाचा एक्स बॉयफ्रेंड तिच्याच वयाचा होता आणि त्याचं नाव दिमित्री कोरोविन असं आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरत राहिला. आता कोरोविनने आपला गुन्हा मान्य करत सांगितलं की ग्रेटाचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून गाडीने तो 300 मील दूर पोहोचला होता. इथेच त्याने तिचा मृतदेह गाडीसह सूटकेसमध्येच सोडला. ग्रेटा आणि कोरोविन यांच्या पैशावरुन काहीतरी वाद झाली होता, तिच्या राजकीय विचारांबद्दल याचा काहीही संबंध नव्हता.
कोरोविनने ग्रेटाच्या मृत्यूनंतर तिचं सोशल मीडिया पेज सतत मेन्टेन केलं, जेणेकरून तिच्या मृत्यूचा किंवा गायब असल्याचा संशय कोणाला येऊ नये. हे तोपर्यंत सुरूच राहिलं जोपर्यंत तिच्या एका युक्रेनियन ब्लॉगर असलेल्या फ्रेंडला संशय आला नाही. तिने रशियन मित्राला याबद्दल माहिती दिली, यानंतर ग्रेटाचा तपास सुरू झाला. अखेर तिच्या प्रियकराने आपणच हत्या केल्याचं मान्य केलं. ग्रेटाने एका वर्षापूर्वीच पुतिनबद्दल ऑनलाईन लिहिलं होतं, की ते सायकोपॅथ आहेत.