बारामती 11 सप्टेंबर : रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना आता बारामतीमधून समोर आली आहे. यात डॉक्टर घरात जेवण करीत होते, त्यामुळे पेशंटला तपासण्यासाठी त्यांनी लवकर दरवाजा उघडला नाही. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी आयुर्वेदीक डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथे डॉक्टरला मारहाण झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. VIDEO: जंगली रेड्याने चालकासह पूर्ण ऑटोरिक्षा शिंगावर उचलली अन्…, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आनंदा अनिल संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा अनिल जगताप, राजेंद्र शंकर जगताप आणि अशोक शंकर जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज गायकवाड हे डॉक्टर असून त्यांचा सांगवी येथे साई क्लिनिक या नावाने दवाखाना आहेत, ते तिथेच राहतात.
6 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास गायकवाड हे घरामध्ये जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून कोणीतरी खिडकीची काच फोडली. जेवण करत असताना लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून ही काच फोडली होती. अखेर डॉक्टरांनी दरवाजा उघडला असता आनंद उर्फ अनिल जगताप, विश्वजीत जगताप, अशोक जगताप, भूषण जगताप यांनी गायकवाड यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. बापरे, तब्बल 2 किमी कारला कंटनेरने नेलं फरफटत, रस्त्यावर आगीच्या ठिणग्या, LIVE VIDEO यानंतर गायकवाड यांचा मुलगा विराज हा तिथे आला आणि वडिलांना का मारता असं त्याने विचारलं. यानंतर चौघांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरूवात केली. गायकवाड यांनी याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत..