JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हिंदूसोबत लग्न करण्याची मुस्लीम तरुणीला मिळाली भयंकर शिक्षा, घरच्यांनीच केलं संतापजनक कृत्य

हिंदूसोबत लग्न करण्याची मुस्लीम तरुणीला मिळाली भयंकर शिक्षा, घरच्यांनीच केलं संतापजनक कृत्य

एका अल्पवयीन अनाथ तरुणीनं दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलासोबत लग्न (Inter-Caste Marriage) केलं. या गोष्टीमुळे नाराज घरच्यांनीच तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 22 जून : एका अल्पवयीन अनाथ तरुणीनं दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलासोबत लग्न (Inter-Caste Marriage) केलं. या लग्नामुळे तरुणीचे चुलते आणि नातेवाईक इतके नाराज झाले, की त्यांनी सोमवारी सकाळी या तरुणीला मारहाण केली. इतकंच नाही तर तिचं मुंडण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर याच अवस्थेत तरुणीला काही वेळ घराच्या आसपास फिरवण्यात आलं. तरुणीसोबत झालेल्या या अमानुष कृत्याची बातमी पसरताच गावातील लोकांनी याला विरोध केला. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपुर कोतवाली क्षेत्रातील एका गावातली आहे. मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, धक्कादायक कारण समोर घटनेची माहिती मिळताच गावात पोहोचलेले पोलीस (Uttar Pradesh Police) तरुणीला कोतवाली येथे घेऊन आले. घटनेत सामील असलेल्या तरुणीच्या सख्ख्या, चुलत चुलत्याला आणि चुलत भावाला अटक करण्यात आली आहे. या तिघांशिवाय इतरही आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फतेहपुर कोतवाली क्षेत्रातील एका गावात मिथून नावाचा एक कामगार युवक राहातो. त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. तर, आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घटनेतील तरुणीही आपल्या आजी-आजोबांसोबत राहात होती. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू होते. रविवारी सकाळी गावातीलच एका धार्मिक स्थळी जात दोघांनीही फेरे घेऊन विवाह केला. यानंतर तरुणी स्वतःच्या इच्छेनं आणि आनंदात आपल्या पतीच्या घरी गेली. कोणावरही विश्वास ठेवताना या 3 गोष्टींचा विचार करा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ या तरुणीच्या विवाहाची माहिती मिळताच चुलते आणि चुलत भाऊ भडकले. सोमवारी सकाळी हे सर्व तरुणाच्या घरी पोहोचले. यावेळी मिथुन काही कामानिमित्त बाहेर गेला होता. ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तरुणीनं म्हटलं, की सोमवारी तिच्या नातेवाईकांनी घरी येत तिला लाथ मारत, चप्पल आणि काठीने मारहाण केली. यानंतर आधी डोक्यावरचे केस कापले, यानंतर संपूर्ण मुंडण केलं. यासोबतच तिला शिवीगाळही केली. हिला जिवंत सोडणं चुकीचं ठरेलं, असंही ते यावेळी म्हणत होते. तिनं सांगितलं, की जीव वाचवून ती याठिकाणाहून पळून आली. तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या