JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 8 वीतील मुलगी हात जोडत राहिली तरीही नराधम दीड वर्षे करीत राहिला बलात्कार...

8 वीतील मुलगी हात जोडत राहिली तरीही नराधम दीड वर्षे करीत राहिला बलात्कार...

आधी त्याने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली, आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकून तो तिच्यावर अत्याचार करीत राहिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 13 जानेवारी : 8वीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन हात जोडत राहिली, मात्र नराधमाला तिची दयादेखील आली नाही, आणि तो तिच्यावर बलात्कार (Rape) करीत राहिला. शरीरसंबंधात नकार दिला तर मुलीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. दीड वर्षे तो तिच्यावर अत्याचार करीत होता. शेवटी मुलीचे शक्ती एकवटून याबाबत आवाज उचलला. ही घटना राजस्थानातील (Rajasthan News) पाली या भागातील आहे. पहिल्यांदा मैत्री मग बलात्कार… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी 23 वर्षीय कल्पेश शर्मा याचं येणं-जाणं सुरू होतं. कल्पेश यांचं बांगड्या निर्यात करण्याचा व्यवसाय होता. तो मुलीसाठी कधी चॉकलेट तर कधी गिफ्ट घेऊन येत होता. हळूहळू ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. संधी साधत त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर तो मुलीला धमकी देऊ लागला. कोणाला काही सांगितलं तर सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. या भीतीने मुलीने कोणासोबत आपलं दु:ख शेअर केलं नाही. हे ही वाचा- निर्भयाची पुनरावृत्ती; मूकबधीर मुलीवर गँगरेप; भयंकर अवस्थेत रस्त्यावर फेकलं दीड वर्षात अनेकदा केला बलात्कार.. दीड वर्षांपर्यंत कल्पेश मुलीला तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार करीत होता. तो तिला हॉटेलमध्ये बोलवत होता. मुलगी अनेकदा त्याच्यासमोर रडली, हात जोडले मात्र तो नराधम तिच्यावर अत्याचार करीत राहिला. सातत्याने होत असलेल्या बलात्कारावर मुलीने कल्पेशसोबत जाण्यास नकार दिला. तिने त्याचा फोन घेणं बंद केलं. यामुळे रागाच्या भरात कल्पेशनने अल्पवयीन मुलीने फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. मुलीला हे कळताच तिने सर्व बाब आईला सांगितली. यानंतर मुलीच्या आईने कल्पेशविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या