JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नात्याला काळिमा! आईने तोंड दाबलं आणि बापानं स्वतःच्याच 7 वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार

नात्याला काळिमा! आईने तोंड दाबलं आणि बापानं स्वतःच्याच 7 वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार

एका पित्याने नात्याच्या सगळ्या सीमा ओलांडत आपल्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यात आरोपीच्या पत्नीनेही त्याची साथ दिली.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 06 जानेवारी : आई-वडिलांसोबतचं मुलांचं नातं हे अतिशय खास असतं. मात्र कधीकधी अशा काही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून समोर आली आहे. यात एका पित्याने नात्याच्या सगळ्या सीमा ओलांडत आपल्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यात आरोपीच्या पत्नीनेही त्याची साथ दिली. ही महिला चिमुकलीची सावत्र आई आहे. ‘पत्र वाचून फाडून टाक’, गुरूजी 8वीतल्या मुलीच्या प्रेमात, लव्ह लेटर समोर आलं अन्… या प्रकरणात नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बाप आणि सावत्र आईला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडील कोरोनाच्या काळात पॉक्सो कायद्यांतर्गत तुरुंगात गेले होते. तिथून सुटका झाल्यानंतर आता त्याने आपल्या सव्तःच्याच मुलीवर बलात्कार केला आहे. एवढंच नाही तर या घटनेत पीडितेच्या सावत्र आईने पतीला पूर्ण पाठिंबा दिला. मुलगी ओरडल्यास तिचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी तिने चिमुकलीचं तोंड दाबून ठेवलं. या प्रकरणी एसपी देहत राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, बहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका व्यक्तीने याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीच्या भाचीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केला. या जबाबाच्या आधारे आरोपी आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सन 2017 मध्येही आरोपीवर कलम 354 आणि 366 नुसार कारवाई करण्यात आली होती. अशाच एका प्रकरणात तो हल्दवानी कारागृहातही गेला आहे. फ्लाईटमधील मस्ती भोवणार! महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर होणार मोठी कारवाई हा संपूर्ण प्रकार कुटुंबातील इतर सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आधी आरोपीला घरी नेलं आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलं. हल्दवानी आणि बरेली येथे आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या