जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'पत्र वाचून फाडून टाक', गुरूजी 8वीतल्या मुलीच्या प्रेमात, लव्ह लेटर समोर आलं अन्...

'पत्र वाचून फाडून टाक', गुरूजी 8वीतल्या मुलीच्या प्रेमात, लव्ह लेटर समोर आलं अन्...

'पत्र वाचून फाडून टाक', गुरूजी 8वीतल्या मुलीच्या प्रेमात, लव्ह लेटर समोर आलं अन्...

प्राथमिक शाळेचा शिक्षक अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. प्रेमात वेड्या झालेल्या या शिक्षकाने मुलीला लव्ह लेटरही लिहिलं.

  • -MIN READ Kannauj,Uttar Pradesh
  • Last Updated :

कन्नोज, 5 जानेवारी : प्राथमिक शाळेचा शिक्षक अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. प्रेमात वेड्या झालेल्या या शिक्षकाने मुलीला लव्ह लेटरही लिहिलं. विद्यार्थिनीने हे प्रेम पत्र जेव्हा घरच्यांना दाखवलं तेव्हा गुरूजी भडकले. उत्तर प्रदेशच्या कन्नोजमधली ही घटना आहे. पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही विद्यार्थिनी कन्नोजच्या कोतवाली भागातल्या शाळेत आठवीमध्ये शिकत आहे. हा शिक्षक शिकवण्याच्या बहाण्याने मुलीला छेडत असल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. शाळांना सुट्टी लागायच्या आधी या शिक्षकाने विद्यार्थिनीला एक पत्र लिहिलं आणि प्रेम असल्याचं सांगितलं. एवढच नाही तर विद्यार्थिनीला शिक्षकाने भेटायलाही बोलावलं. शिक्षकाच्या या कृत्यामुळे विद्यार्थिनी घाबरली आणि तिने घरच्यांना हे पत्र दाखवलं. जेव्हा आम्ही शिक्षकाकडे गेलो आणि माफी मागायला सांगितली तेव्हा त्याने आमच्याशीच वाद घालायला सुरूवात केली आणि आम्हाला तिथून हकलून लावलं, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाचं पत्र ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सुट्टीमध्ये तुझी खूप आठवण येईल. मी तुला खूप मिस करेन. तुला फोन मिळाला तर मला फोन कर. शिक्षकासोबत फोनवर बोलता येतं. सुट्टीच्या आधी मला भेटायला नक्की ये. प्रेम करत असशील तर नक्की येशील. जर मी तुला 8 वाजता बोलावलं तर तू लवकर शाळेत येऊ शकतेस. जर येणार असशील तर मला सांग. तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे. तुझ्याजवळ बसून एकमेकांना आपलंस करून आयुष्यभरासाठी तुझं व्हायचं आहे. मी कायमच तुझ्याशी प्रेम करेन. पत्र वाचून फाडून टाक, कुणालाही दाखवू नकोस,’ असं पत्र शिक्षकाने विद्यार्थिनीला लिहिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात