JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / AC रिपेअर करायला आला अन् 5 वर्षीय चिमुकलीला लिफ्टमध्ये नेत..; तरुणाच्या कृत्यानं पनवेल हादरलं

AC रिपेअर करायला आला अन् 5 वर्षीय चिमुकलीला लिफ्टमध्ये नेत..; तरुणाच्या कृत्यानं पनवेल हादरलं

आरोपी नराधम अख्तर हुसेन हा एसी रिपेअरिंगचे काम करणारा 19 वर्षीय व्यक्ती संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान इमारतीत आला होता. एका रूममधून तो एसी रिपेअरिंग करून लिफ्टमधून खाली आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, पनवेल 09 डिसेंबर : नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेज एकमधील एका इमारती बाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. AC रिपेअरिंग करायला आलेल्या व्यक्तीने पाच वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्येच लैंगिक अत्याचार केले आहेत. एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 19 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ‘आई-बाबा घरी नाहीत, तू ये..’; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं आरोपी नराधम अख्तर हुसेन हा एसी रिपेअरिंगचे काम करणारा 19 वर्षीय व्यक्ती संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान इमारतीत आला होता. एका रूममधून तो एसी रिपेअरिंग करून लिफ्टमधून खाली आला. यावेळी त्याला पार्किंगमध्ये एक पाच वर्षीय मुलगी खेळताना दिसली. आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून आणि मुख्य म्हणजे त्यावेळी सुरक्षा रक्षकही हजर नसल्याचं लक्षात आल्यावर त्याने याचा फायदा घेतला. या व्यक्तीने त्या मुलीला लिफ्टमध्ये नेलं आणि तिच्यावर लिफ्टमध्येच जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहचल्यावर त्याने मुलीला सोडून दिलं. ती घरात जाऊन उलटी करत असताना आईला तिने सर्व प्रकार सांगितला. लगेचच आई वडील खाली आले. यावेळी मुलीने आरोपी पळून जात असताना ओळखले आणि हाच तो असल्याचं सांगितलं. वडील आणि सुरक्षा रक्षकाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याच्याविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. क्रूरतेचा कळस! 12 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून केलं संतापजनक कृत्य अधिक तपास करण्यासाठी त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. हा व्यक्ती एसी रिपेअरिंग वाला असल्याने तो अनेक ठिकाणी एसीचं काम करण्यास जात असतो. त्यामुळे त्याने आणखीही कुठे असे प्रकार केले आहेत का, याची चौकशी केली जाईल. सदर मुलीवर रूग्णालयात उपचार करण्यात आले, आता तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र बाहेरून येणारे डिलिव्हरी बॉय, काम करणारे लोक यांच्यापासून खूप सावधानता बाळगावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या