पुणे, 28 जून : विद्येचं माघेरघर अशी पुण्याची संपूर्ण राज्यात ओळख आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर जगभरातील विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात. उत्तम शिक्षणाबरोबरच सुरक्षित शहर अशी पुण्याची ओळख होती. पण, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे पुण्याच्या प्रतिमेला डाग लागलाय. MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारची हत्या आणि त्यापाठोपाठ सदाशिव पेठमध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला या दोघ घटनांमुळे पुण्यातील विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. आई-वडिलांची काळजी वाढली पुण्यात MPSC शी संबंधित दोन घटना काही दिवसांच्या अंतरानंच घडल्या आहेत. त्यामुळे शहरात या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेची काळजी त्यांच्या आई-वडिलांना वाटत आहे. ‘या घटनांमुळे आमच्या पालकांची काळजी वाढलीय. तू ज्या मुलांसोबत असतेस ते कसे आहेत? हा प्रश्न आई-वडिल आम्हाला फोन करून विचारतात.
मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झालीय. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्यात संवाद आवश्यक आहे,’ असं मत पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुस्कान नदाफनं व्यक्त केलीय. प्रेमसंबंधास नकार, विवाहितेने बॉयफ्रेंडला पुण्यातून केलं किडनॅप, गुजरातला हॉटेलवर नेऊन.. ‘स्वत:ची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे.त्यासाठी सेल्फ डिफेन्सचे स्किल शिकले पाहिजेत, असं आणखी एक विद्यार्थीनी संस्कृती जाधवनं सांगितलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या चार-पाच मुली एकत्र राहण्याचं प्रमाण पुण्यात मोठं आहे. या मुलींनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. काही शिस्त त्यांनी स्वत:ला लावून घेतली पाहिजे. अन्यथा अशा मुलींचा फायदा घेणाऱ्यांची संख्या समाजात खूप आहे, असा सल्ला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास घेणारे शिक्षक निलेश निंबाळकर यांनी दिला. प्रेम करणं किंवा न करणं हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण स्वत:वर कंट्रोल हवाच असं त्यांनी स्पष्ट केलं.