पुणे 19 जुलै : पुण्यातील एका 15 वर्षीय मुलीवर स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Pune School Bus Driver Rapes Minor Girl).. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, सुरुवातीला पीडितीने वडिलांना आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी कहाणी सांगितली होती. तिला आरोपीचं नाव उघड करण्याची भीती वाटत असल्याने तिने असं केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात एका दहावीच्या विद्यार्थीनीला स्कूल बस चालकाने पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना 16 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी वाहनचालकाला पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली आहे. स्कूल बस चालकाचा 15 वर्षीय मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली आणि आरोपी ड्रायव्हर तिथून पळून गेला. यानंतर तिने तिच्या मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतला. ती रात्री उशिरा घरी पोहोचली तेव्हा त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला इतका उशीर का झाला, याबद्दल विचारणा केली. तिने सांगितलं की, चार अज्ञात लोकांनी रिक्षात तिच्यावर हल्ला केला. वडील घाबरले आणि तिला ताबडतोब पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यासाठी घेऊन गेले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या जबाबाच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासून प्राथमिक तपास सुरू केला आहे. कोणताही सुगावा न मिळाल्याने त्यांनी मुलीशी बोलण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तिला विश्वासात घेतलं. यानंतर या मुलीने खरी घटना आणि स्कूल बस चालकाने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. 80 वर्षांच्या सासऱ्याने केला 55 वर्षांच्या सुनेचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक प्रकार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितलं की, ड्रायव्हरने १५ वर्षीय मुलीला प्रपोज केलं होतं, पण तिने त्याला नकार दिला होता. रागाच्या भरात त्याने तिला एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. ते पुढे म्हणाले, “आम्ही मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे".