प्रतिकात्मक फोटो
पुणे 29 सप्टेंबर : लोन ॲप प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बंगळुरूमधून 9 जणांना अटक केली आहे. बनावट कॅाल सेंटरमधून हे लोक लोन ॲपचा धंदा चालवत होते. महिलेला मोबाइलमध्ये ‘लोन ॲप’ डाउनलोड करायला सांगून तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर केलं गेलं. यानंतर त्याचे पैसे व्याजासहित परत करण्याचं सांगत बदनामी करण्याची तसंच जीवे मारण्याची धमकी देऊन 1 लाख 11 हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर ही कारवाई करण्यात आली. भावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना याप्रकरणी बंगळुरू येथील कॉल सेंटरमधील 9 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. लोन ॲपमधून होणारी बदनामी टाळण्यासाठी एका नातीने आपल्या आजीचा खून केला तर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले. यानंतर ‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत तीस वर्षाच्या महिलेनं फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन स्वरुपात घडलेला. या प्रकरणाचा तपास करून सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून 9 आरोपींना अटक केली. आरोपींनी या महिलेच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे आणि माहिती चोरली. त्यानंतर ही छायाचित्रे मॉर्फ करत त्यावर बदनामीकारक संदेश लिहून संपर्क यादीतील लोकांना पाठवित महिलेला खंडणीसाठी धमकावलं. महिलेनं याबाब तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे. चोरी करून फरार झालेल्या नोकरास बिहारमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई, आठ लाखांचा मुद्देमालही जप्त न्यायालयाने या नऊ जणांना सात ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींना सीमकार्ड आणि बँक खाती कोणी पुरवली याची चौकशी करायची आहे. आरोपींनी उकळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करून खंडणीची रक्कम हस्तगत करायची आहे. यासाठी ही पोलीस कोठडी मागण्यात आली होती.