JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत येणार? इनफ्लून्सर सपना गिलची न्यायालयात 'ही' मागणी

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत येणार? इनफ्लून्सर सपना गिलची न्यायालयात 'ही' मागणी

इनफ्लून्सर सपना गिल हिच्यावर कथित हल्ला केल्या प्रकरणी पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारीत मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत येणार?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 एप्रिल : भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिलने अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सपना गिल हिच्यावर कथित हल्ला केल्या प्रकरणी पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारीत मागणी करण्यात आली आहे. सपना गिलनं तक्रार करूनही पृथ्वी विरोधात कारवाई न करणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली आहे. यावर आता 17 एप्रिलला सुनावणी  होणार आहे.

काय आहे प्रकरण? 15 फेब्रुवारी 2023 ला अंतरराज्य विमानतळ जवळील एका हॉटेलबाहेर दोन गटात सेल्फी काढण्यावरून झाला वाद होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सपना गिल आणि तिच्या मित्राला अटक केली होती. सपना गिलने असा आरोप केला की, पृथ्वी शॉची मोठ्या लोकांसोबत ओळख असून तिच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. मला खोट्या आरोपांवरून गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. पृथ्वी शॉच्या मित्रांच्या वैयक्तिक बदल्यासाठी आणि त्रास देण्याच्या हेतूने कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचंही सपनाने म्हटलं आहे. वाचा - सहाय्यक पोलीस निरीक्षकानं हे काय केलं, पत्नी आणि मुलावरच झाडल्या गोळ्या… याचिकेत सपना गिलने विनंती केलीय की, पोलिसांनी तिच्याविरोधातील गुन्हा रद्द करावा. ओशिवारा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याविरोधातही कारवाई करावी अशी मागणी तिने याचिकेत केलीय. सपना गिल आणि इतरांवर फेब्रुवारी महिन्यात शिवीगाळ आणि हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सपना आणि तिच्या मित्रांनी हल्ल्यानंतर खोटी तक्रार देण्यासह धमकी दिली. तसंच तक्रार मागे घेण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणीही करण्यात आली. या प्रकरणी सपना गिलला 17 फेब्रुवारीला अटकही करण्यात आली होती. तर 20 फेब्रुवारी रोजी जामीन मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या