(प्रातिनिधीक फोटो)
पिंपरी, 28 फेब्रुवारी: अलीकडेच पिंपरीत (Pimpri) एका महिला वकिलावर पुरुष वकिलानं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधम आरोपीनं पीडित महिलेला गुंगीचं औषध पाजून विकृतीचा कळस गाठला होता. ही घटना ताजी असताना आता पिंपरीत आणखी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. येथील एका पोलिसानं महिला प्राध्यापकावर बलात्कार (police raped woman professor) केला आहे. आरोपीनं पीडित महिलेचा एकटेपणाचा गैरफायदा घेत आणि लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनीच लैंगिक शोषण केल्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. आकाश प्रकार पांढरे असं गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय आरोपी पोलिसाचं नाव आहे. तो पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आरोपी पांढरे मागील काही काळापासून पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण करत होता. दरम्यान पीडित महिला गरोदर राहिली असता, आरोपीनं पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला आहे. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित प्राध्यापक महिलेनं भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा- मिटींगसाठी बोलावून केला विश्वासघात; नराधमाने महिला वकिलाला गुंगीचं औषध दिलं अन्.., पुण्यातील धक्कादायक घटना पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पीडित महिला आपल्या मुलीसोबत भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती एकटी राहत असल्याचं पाहून आरोपी पांढरे यानं तिचा गैरफायदा घेतला. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला भोसरी, साखरेवस्ती आणि हिंजवडी फेज एक परिसरात घेऊन जात वारंवार जबरदस्तीने शारीरिक आणि अनैसर्गिक संबंध ठेवले आहेत. हा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. हेही वाचा- हॉस्टेलला सोडण्याचा केला बहाणा; अल्पवयीन मुलीसोबत NCP नेत्याचं विकृत कृत्य दरम्यान पीडित प्राध्यापिका गरोदर राहिली असता, आरोपीनं गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन पीडितेचा गर्भपात घडवला आहे. तसेच तू एकटी कशी राहते तेच बघतो, अशी धमकी देखील आरोपी पोलिसांनं दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.