Home /News /pune /

मिटींगसाठी बोलावून केला विश्वासघात; नराधमाने महिला वकिलाला गुंगीचं औषध दिलं अन्.., पुण्यातील धक्कादायक घटना

मिटींगसाठी बोलावून केला विश्वासघात; नराधमाने महिला वकिलाला गुंगीचं औषध दिलं अन्.., पुण्यातील धक्कादायक घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका महिला वकिलावर बलात्कार (Rape on woman lawyer) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं कामानिमित्त एका हॉटेलमध्ये बोलावून पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे.

    पिंपरी, 28 फेब्रुवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एका महिला वकिलावर बलात्कार (Rape on woman lawyer) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित महिलेला कामानिमित्त एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. याठिकाणी त्यानं पीडितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडित महिलेचं विवस्त्र फोटो देखील (Clicked nude photos) काढले. या प्रकरणी पोलिसांनी एका वकिलासह दोन महिलांवर गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून पुढील तपास केला जात आहे. अॅड. अजय अप्पाराव साताळकर असं गुन्हा दाखल झालेल्या 39 वर्षीय आरोपीचं नाव असून तोही एक वकील आहे. यासोबत अन्य दोन महिलांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. यातील एक महिला वकील आहे. 38 वर्षीय पीडित महिला वकिलानं 26 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वकील साताळकर यानं फिर्यादी महिला वकिलासोबत ओळख वाढवून मैत्री केली होती. त्यानंतर त्यानं पीडितेकडं लग्नाची मागणी केली. पण त्यांनी लग्नास नकार दिला. यानंतर आरोपीनं एसआसएचं काम मिळालं असल्याची बतावणी केली. त्यासाठी पक्षकारांसोबत बोलणी करून काम समजून घेण्यासाठी फिर्यादीला पिंपरीतील एका हॉटेलमध्ये बोलावलं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं पीडितेच्या नकळत तिला गुंगीचं औषध दिलं. हेही वाचा-बीडमध्ये दिवसाढवळ्या रक्तपात; मायलेकीवर चाकुने सपासप वार, आईचा मृत्यू लेक गंभीर काही वेळातच पीडितेला गुंगी आल्यानंतर आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडितेचं नग्नावस्थेतील अश्लील फोटो देखील आपल्या मोबाइलमध्ये काढले. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपीनं लग्न करण्याचं आमिष दाखवलं तसेच घटनेची वाच्यता न करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिला वकिलावर वेळोवेळी अत्याचार केला आहे. हेही वाचा-पत्नीसोबत गाठला अमानुषतेचा कळस; हातपाय बांधून जिवंत जाळलं, कारण वाचून बसेल धक्का आरोपीनं पीडितेला 2018 ते 2022 दरम्यान पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी आणि खराडी या भागात विविध ठिकाणी घेऊन जात लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं आरोपीला भेटण्यास नकार दिला. आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेनं अखेर 26 फेब्रुवारी रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात जाऊन तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pimpri chinchawad, Pune, Rape

    पुढील बातम्या