JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / एका आजारामुळे पकडला गेला बलात्कार प्रकरणातील आरोपी; तपासात असं फुटलं बिंग

एका आजारामुळे पकडला गेला बलात्कार प्रकरणातील आरोपी; तपासात असं फुटलं बिंग

युवतीनं मडियाव ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटलं, की तीन दिवसांपूर्वी ती काकोरी येथे जाण्यासाठी एका टेम्पोमध्ये बसली. टेम्पो चालक तिला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यासोबत छेडछाड करू लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 31 जुलै : एका बलात्काराच्या घटनेत (Rape Case) आरोपीच्या आजारानंच त्याची पोलखोल केली आहे. तीन दिवसांआधी एका युवतीनं आरोप केला होता, की एका टेम्पो चालकानं निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिची छेड काढली आणि बलात्कार केला. युवतीनं पोलिसांना (UP Police) सांगितलं होतं, की आरोपी टेम्पो चालक हा थायरॉइडचा (Thyroid Disease) रुग्ण होता. त्याच्या गळ्यावर याचे निशाणही होते. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊ येथील आहे. गेममुळे नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे युवतीनं मडियाव ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटलं, की तीन दिवसांपूर्वी ती काकोरी येथे जाण्यासाठी एका टेम्पोमध्ये बसली. टेम्पो चालक तिला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यासोबत छेडछाड करू लागला. यानंतर त्यानं तरुणीवर बलात्कार केला. पीडितेनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी बालागंज चौक आणि काकोरी टेम्पो स्टॅण्डवर आपली टीम पाठवली. चौकशीनंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की वजीरगंज परिसरातील अमान खान या आजारानं ग्रस्त आहे. एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीची आत्महत्या पोलीस अमान खानच्या घरी पोहोचले असता समजलं, की तो टेम्पो घेऊन सीतापूर रोडकडे निघाला आहे. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर अमान खान याला छंदोईया चौकातून अटक करण्यात आली. अलीगंजच्या एसपींनी सांगितलं, की महिलेनं टेम्पोचा नंबर पाहिला नव्हता तसंच आरोपीची ओळखही ती सांगू शकत नव्हती. मात्र, गळ्याला असलेल्या आजाराच्या निशाणामुळे आरोपीला पकडण्यात यश आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या