नवी दिल्ली 06 जून : लग्नाच्या काही तासांनंतर एका नवरदेवाने वधूवर हल्ला केला (Bride Beaten by Groom in Party). त्यानंतर पोलिसांनी त्याला लग्नाच्या पार्टीतच अटक केली. वराचं हिंसक वागणं पाहून नवरीने पोलिसांना फोन करुन बोलावलं. या लग्नात पाहुण्यांना भरपूर दारू देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. एक ब्रिटीश जोडपे स्पेनला सुट्टी घालवण्यासाठी गेलं होतं. तिथेच त्यांनी लग्न करण्याचा बेत आखला. लग्नाच्या काही तासांनंतर नवरदेवाने पार्टीतच हिंसक होऊन आपल्या नवविवाहित पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. एकाच महिलेवर जडले दोघांचे प्रेम, चाकूने वार करून मित्राने मित्राला संपवलं, अमरावतीतील घटना ‘द मिरर’च्या वृत्तानुसार ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजता घडली. लग्नानंतर पार्टी सुरू होती. पार्टीत पाहुण्यांना पेय देण्यात आले. लोक नाचत आणि गात होते. त्यानंतर काहीतरी कारणावरुन वराला राग आला आणि त्याने वधूला मारहाण केली. नवरदेव हिंसक होत असल्याचं पाहून पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस येण्यापूर्वीच नवरी पार्टीमधून निघून गेली होती. असं सांगितलं जात आहे की जेव्हा पोलीस लग्नाच्या पार्टीत पोहोचले तेव्हा त्यांनी नवरदेवाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो आटोक्यात येत नव्हता. अशा स्थितीत पोलिसांना त्याला अटक करून पार्टीतून बाहेर घेऊन जावं लागलं. FB वर प्रेम, लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध; मात्र धोका दिल्याचं कळताच प्रेयसीने दिला दुर्देवी मृत्यू वधू पार्टीतून गायब झाल्यानंतर पोलिसांना तिची चौकशी करायची होती. पण काही वेळातच नवरी पुन्हा पार्टीत आली. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी वराला अटक करून आपल्यासोबत नेलं होते. आत्तापर्यंत, वधू आणि पाहुण्यांनी वराला सोडवण्याचा प्रयत्न केला की नाही हे समजलेलं नाही.