JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / PM मोदी, अमित शाहंचे मॉर्फ फोटो आणि व्हिडीओ.. तक्रार करणाऱ्याचंही फेसबुक हॅक

PM मोदी, अमित शाहंचे मॉर्फ फोटो आणि व्हिडीओ.. तक्रार करणाऱ्याचंही फेसबुक हॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मॉर्फ फोटो आणि व्हिडीओ प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी रांचीवरुन एकाला अटक केली आहे.

जाहिरात

PM मोदी, अमित शाहंचे मॉर्फ फोटो आणि व्हिडीओ..

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 एप्रिल : सोशल मीडियाचा प्रचार-प्रसार वाढल्यापासून त्याचा चुकीच्या गोष्टींसाठीही वापर वाढला आहे. अनेकदा मॉर्फ फोटो करुन एखाद्या व्यक्तीची बदनामी केली जाते. अशाच एका प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ आणि फोटो मॉर्फ करून देशभरात बदनामी करणाऱ्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सायबर विभागाने अटक केली आहे.

काय आहे प्रकरण? शमीम जावेद अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांचं नावं असून त्याला झारखंड राज्यातील रांची मधून अटक करण्यात आली आहे. राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी यासंदर्भामध्ये सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली होती, त्यानंतर तब्बल तीन महिने तपास करून सायबर पोलीस या तरुणापर्यंत पोहोचले. मात्र, आरोपीने तक्रार करणाऱ्या माजी खासदार अमर साबळे यांचे फेसबुक अकाउंटही हॅक केले, अशी माहिती साबळे यांनी दिली. तर संबधित तरुणाला आज पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे. वाचा - बसमध्ये तरुणांकडे सापडल्या 5 बॅग, पोलिसांना 6 तास लागले मोजायला, किती होती रक्कम हा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपीने देशातील अनेक राजकीय नेत्यांचे फोटो, व्हिडिओ मॉर्फ केले असल्याची बाब तपासात उघडकीस आली आहे. जर अशा पद्धतीने कुणी फोटो, व्हिडिओ मॉर्फ करत असेल तर त्यांच्या विरोधातही सायबर ॲक्टनुसार गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी माहिती सायबर सेलचे प्रमुख संजय तुंगार यांनी दिली आहे. शिवसेना महिला नेत्याचाही व्हिडीओ व्हायरल शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फिंग केलेला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर आरोप केला होता. ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या साईनाथ दुर्गेला अटक करण्यात आलं आहे. यावरुन या गोष्टी कोणत्या थराला गेल्या आहेत, हे कळतं, असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या