JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मुलं चोरणारा समजून शेकडो लोकांनी त्याला घेरलं अन्.., ठाण्यातील धक्कादायक घटनेचा Video

मुलं चोरणारा समजून शेकडो लोकांनी त्याला घेरलं अन्.., ठाण्यातील धक्कादायक घटनेचा Video

हा व्यक्ती मुलं चोरण्यासाठी आलेला नव्हता. मात्र, गैरसमजातून काहीही विचार न करता तिथल्या नागरिकांनी या व्यक्तीला जबर मारहाण केली. विशेष बाब म्हणजे या व्यक्तीला एक-दोन नव्हे तर शेकडो लोकांनी मिळून मारहाण केली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय, ठाणे 30 सप्टेंबर : गैरसमजातून ठाण्याच्या दिव्यात एका व्यक्तीला नागरिकांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनीमध्ये एक हॉटेल कर्मचारी चिकन घेत होता. दरम्यान त्याने मुलांकडे पाहिलं. यामुळे हा व्यक्ती मुलं चोरतो असा गैरसमज झाला. यानंतर तिथल्या नागरिकांनी त्याला बेदम महाराण केली. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात; नाशकातील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO हा व्यक्ती मुलं चोरण्यासाठी आलेला नव्हता. मात्र, गैरसमजातून काहीही विचार न करता तिथल्या नागरिकांनी या व्यक्तीला जबर मारहाण केली. विशेष बाब म्हणजे या व्यक्तीला एक-दोन नव्हे तर शेकडो लोकांनी मिळून मारहाण केली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाला असून त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यासोबतच कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहोत, असं  पोलिसांनी सांगितलं आहे.सोशल नवी मुंबईत तरुणाला चौघांकडून प्रचंड मारहाण, धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO मीडियावर सध्या मुलं पळवणाऱ्या टोळी संबंधित चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच कारणामुळे काही ठिकाणी मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचा प्रकारही समोर येत आहे. नाशिक शहरातही गेल्या दोन दिवसांत मुलं चोरण्याच्या संशयावरून मारहाणीच्या तीन घटना समोर आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या