JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचं सर्वांसमोर सीटवरच किळसवाणं कृत्य; मुंबई ते दिल्ली फ्लाईटमधील घटना

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचं सर्वांसमोर सीटवरच किळसवाणं कृत्य; मुंबई ते दिल्ली फ्लाईटमधील घटना

एका प्रवाशाने विमानात आधी लघवी केली आणि नंतर शौच केलं. इतकंच नाही तर नंतर तो विमानात थुंकत राहिला. हे विमान मुंबईहून दिल्लीला जात होतं.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जून : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यात एका प्रवाशाने विमानात आधी लघवी केली आणि नंतर शौच केलं. इतकंच नाही तर नंतर तो विमानात थुंकत राहिला. हे विमान मुंबईहून दिल्लीला जात होतं. घटना 24 जूनची आहे. राम सिंह असं आरोपीचं नाव असून त्याला दिल्लीच्या IGI पोलिसांकडे (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ) सोपवण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 294/510 अंतर्गत एफआयआर नोंदवलं आहे. आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये राम सिंह नावाच्या प्रवाशाने आधी विमानातच लघवी केली यानंतर तिथेच शौच केलं. इतक्यावरच तो थांबला नाही तर यानंतर तो तिथेच थुंकू लागला. ही घटना फ्लाइट क्रमांक AIC866 मध्ये घडली आहे. या प्रवाशाने केबिन क्रू मेंबर आणि इतर प्रवाशांसोबत वादही घातला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. ..अन् हवेतच विमानाचा दरवाजा उघडायला पळाला व्यक्ती; घाबरलेल्या प्रवाशांनी केलं हे काम क्रू मेंबरने तातडीने विमानाच्या पायलटला आणि एअर इंडिया सिक्योरिटीला याबाबतची माहिती दिली. प्रवाशी राम सिंह दिल्लीत उतरताच त्याला आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, फ्लाइटमध्ये हा प्रवासी सीट क्रमांक 17F वर बसला होता. तिथेच त्याने शौच केलं आणि जमिनीवर लघवी केली. 24 जून 2023 रोजी मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AIC 866 फ्लाइटमध्ये प्रवासी राम सिंह सीट क्रमांक 17F वर बसला होता. त्याने विमानात शौच, लघवी केली आणि थुंकला. फ्लाइटच्या केबिन क्रूने या घटनेवर आक्षेप घेतला. प्रवाशाला तिथून हटवण्यात आलं. केबिन क्रू अमन वत्स यांनी पायलट-इन-कमांड कॅप्टन वरुण संसारे यांना घटनेची माहिती दिली. याची माहिती तातडीने एअर इंडियाला पाठवण्यात आली. विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या घटनेवर विमानातील इतर प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या