जयपूर, 15 एप्रिल : राजस्थानमधील (Rajasthan News) सिरोही जिल्ह्यातील फुलाबाई गावात रहस्यमयी आजारामुळे 4 दिवसात 7 मुलांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाची टीम मृत्यूमागील तपास करण्यास व्यस्त आहे. टीमने गुरुवारी गावातील 250 हून अधिक घरांचं सर्वेक्षण केलं. घराघरांमध्ये जाऊन 58 मुलांच्या रक्ताचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. ते तपासासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात मुलांचा मृत्यू व्हायरल (एक्यूट फेस ऑफ वायरस) मुळे झालं असं सांगितलं जात आहे. मुलं तीन दिवसांपासून आजारी होते. याशिवाय भागातील दुकानांमध्ये आयस्क्रीम आणि काही थंड पेय विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर पीडित कुटुंबाच्या लोकांचं म्हणणं आहे की, मुलांना ताप, रक्ताच्या उटल्यांचा त्रास होत होता. यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि मृत्यू झाला.
हे ही वाचा- बेडवर बसून गेम खेळताना मागून काकी आली अन्…छतावर आढळला जशचा मृतदेह
गुरुवारीदेखील तीन मुलांची तब्येत बिघडली… आरोग्य विभागाच्या निर्देशकांनी सांगितलं की, गुरुवारी योगेश (4) पुत्र विकाराम, वाकाराम (11) पुत्र थावराराम, गुड़िया (11) यांची तब्येत बिघडली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
AIIMS च्या टीमकडून तपास सुरू… जयपुर आणि जोधपुरहून आलेली AIIMS ची टीम या विचित्र आजाराबाबत माहिती जमा करीत आहे. याशिवाय टीमने आजूबाजूच्या दुकानात आणि ठेल्यावर विकले जाणारे थंड पेय पदार्थांचे सँम्पल जमा केले आहेत. याशिवाय या दुकानांमध्ये थंड पेय विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. पीएमओ एके मौर्यने सांगितलं की, प्राथमिक तपास आणि सर्वेनुसार मुलांचा मृत्यू व्हायरलमुळे (एक्यूट फेस ऑफ व्हायरस) झाला आहे.