इस्लामाबाद, 11 मार्च : दाम्पत्य जेव्हा आई-बाबा बनतं, तेव्हा (Parenting) त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. घरात येणारा बाळाचा आवाज, त्याच्या अंगाचा वास, त्याचे छोटे छोटे हात…सर्वच क्षण पालकांना आठवणीत ठेवावेसे वाटतात. आई तर बाळाला लांब ठेवत नाही. वडिलदेखील आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करतात. आणि त्यांच्यासाठी जीवही देऊ शकतात. मात्र पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने आपल्याच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pakistani man killed 7 days old daughter) मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाकिस्तान पोलिसांनी पंजाब प्रांतातील मियावली शहरातून (Mianwali, Punjab Province) शाहजेब खान (Shahzaib Khan) नावाच्या व्यक्तीला अटक केलं आहे. त्याने 7 मार्च रोजी स्वत:च्या 7 दिवसांच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. मात्र (father killed new born daughter due to gender) यामागील कारण ऐकून कोणाचाही संताप होईल. हे ही वाचा- नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 5 अर्भक आढळल्याचं प्रकरण, CCTVतून धक्कादायक खुलासा वडिलांनी नवजात मुलीला गोळ्या घातल्या… द सन वेबसाइटमधील रिपोर्टनुसार, व्यक्तीला मुलाची (Man wanted son, shot new born daughter) अपेक्षा होती. त्याच रागात बापाने मुलीची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मामांनी सांगितलं की, जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील खूप रागात होते. पोस्ट-मार्टेम रिपोर्टनुसार, त्याने मुलीवर 5 गोळ्या झाडल्या होत्या, यात तिचा जागीच मृत्यू झाला. 2 वर्षात 500 नवजात बाळाचा मृत्यू… वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये पाकिस्तानला शेवटचं स्थान देण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा सोशल वेल्फेअर चॅरिटी ग्रुप चालवणारे फैजल ईदीने द सनला सांगितलं की, गेल्या दोन वर्षात 500 हून जास्त नवजात बाळांचे मृतदेह कचरा कुंडीत पडलेली मिळाली. यात अधिकतर मुलीच होत्या. सोशल मीडियावर पाकिस्तानातील तरुण या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देत आहेत. आणि अशी मानसिकता असणाऱ्या लोकांवर टीका केली जात आहे.