नागपूर, 11 मार्च : नागपूरच्या (Nagpur) क्वेटा कॉलोनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पाच अर्भक (5 infants found in garbage) मिळाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर पोलीस यंत्रणाही कामाला लागली आणि आपला तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तसेच हे अर्भक कुणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकले त्याचाही उलगडा सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून झाला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीस तपासात हे अर्भक जवळच्याच पुरोहित नर्सिंग होम चे असल्याचं पुढं आलंय. हे अर्भक सहा वर्षे जुने आहेत. स्त्री रोग तज्ञ डॉ. यशोदा पुरोहित यांनी एका हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सहा अर्भक आणले होते. ते अर्भक त्यांनी नर्सिंग होममध्ये सुरक्षित ठेवले होते. मात्र, 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी नर्सिंग होमच्या पुनर्निर्मितीस सुरुवात झाली. त्यामुळे डॉ. गोकुळ पुरोहित यांनी केअरटेकर बिपीन शाहू याला जुने साहित्य विकून टाकण्यास सांगितले. भंगारवाल्याला हे साहित्य विकून टाकण्यात आले. मात्र, भंगारवाल्याने भंगारासह बायोमेडिकल वेस्ट आणि अर्भक ही घेतले.
वाचा : अवघ्या 5 दिवसात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; चिमुकलीचं अपहरण करणाऱ्याला कठोर शिक्षाघटना सीसीटीव्हीत कैद
आपल्या कामाचे नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक फेकून दिले. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झालाय. काचेच्या बरणीत असलेले हे अर्भक नंतर एका कचरा विकणाऱ्या व्यक्तीने काचेची बरणी घेऊन अर्भक तसेच टाकून दिले. मात्र, उत्तरीय तपासणीनंतर सत्यता बाहेर येईल अशी नागपूर पोलिसांनी दिली आहे.
वर्ध्यातील आर्वीच्या कदम हॉस्पिटल प्रकरणाची आठवण
जानेवारी महिन्यात वर्ध्यातील आर्वीमध्ये असाच प्रकार समोर आला होता. आर्वीतील कदम रुग्णालयाच्या परिसरात 11 मानवी कवट्या आणि 54 अवशेष जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.
5 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय मुलीचा डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता. अधिकचे पैसे आकारून एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची तक्रार आर्वी पोलिसात देण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम हिला अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते. पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले होते. या प्रकरणी डॉक्टर कदम यांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.