श्वानाची हत्या
चितरंजन सिंह, प्रतिनिधी बदायूं : पोलिसांचं काम असतं की चोरांना पकडणं, पण आता पोलिसांना ते काम सोडून चक्क साप, कुत्रा आणि उंदराची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करुन घेण्याची वेळ आली. या घटनेमुळे गावातही चर्चा रंगली आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीनं जो खुलासा केला त्याने तर पोलीसही चक्रावले आहेत. उत्तर प्रदेशातील बुदौन जिल्ह्यात उंदीर, साप आणि आता कुत्र्याला मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. बदायूंतील कुंवरगाव परिसरात एका तरुणाने रस्त्यावरील कुत्र्याला काठीने मारहाण करून ठार केले. याचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. कुंवरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सिगोही गावचा फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये कुत्र्याला मारहाण केल्यानंतर एका तरुणाने तो आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला होता, त्यानंतर प्राणीप्रेमींना याची माहिती मिळाली. या गावात राहणाऱ्या नेत्रपाल नावाच्या तरुणाने कुत्र्याला काठीने मारून हत्या केली. काही लोकांनी त्याचा फोटो काढला, ज्यामध्ये आरोपी कुत्र्याच्या मृतदेहाजवळ काठी घेऊन उभा आहे. आरोपींनी कुत्र्याचा मृतदेह गावाच्या सीमेवर असलेल्या तलावात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तलावातून मृत कुत्र्याला बाहेर काढून त्यांचं शवविच्छेदन केलं. पोलिसांनी कुत्र्याला मारण्यामागचं कारण विचारलं, त्यावर आरोपीने सांगितलं की या कुत्र्याने त्याच्या बकरीला मारलं होतं. एवढंच नाही तर हा कुत्रा भावाला चावला होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात कुत्र्याची हत्या केल्याचं सांगितलं आहे. या कुत्र्याला धडा शिकवणं एवढाच त्याचा हेतू होता मात्र या हाणामारीत त्या कुत्र्याचा जीव गेल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांना आरोपीवर गुन्हा दाखल केला असून सध्या त्याला बेलवर सोडलं आहे.