तरतारन, 4 मे : पंजाबच्या तरतारनमध्ये अनिवासी भारतीय जितेंद्र पाल याची गोळ्या झाडून हत्या (NRI Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी एका आठवड्यानंतर हत्येच्या आरोपात जितेंद्रचा मित्र मनी आणि त्याची प्रेयसी लखविंदर कौर उर्फ निक्की या दोघांना अटक अटक करण्यात आली आहे. हत्येच्या एक आठवड्यानंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अजूनही एक जण फरार असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? तरनतारनच्या सुहावा गावातील 25 वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनाडाला गेला होता. तिथे त्याला स्थायी रहिवासी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जितेंद्र 16 एप्रिलला गावी परत आला. यानंतर त्याने आनंदात तरनतारन येथील एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या मित्रांना पार्टी देण्याचे ठरवले. 23 एप्रिल रोजी संध्याकाळी तो तीन मित्रांसह रेस्टॉरंटमध्ये गेला होता. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. जितेंद्र हा घरातील एकूलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा - नवरदेवाचे कळाले नको ‘ते’ उद्योग, हळदीच्या दिवशी निघाली पोलीस स्टेशनात वरात! एसएसपी रंजीत सिंह ढिल्लो यांनी याप्रकरणाचा खुलासा करत सांगितले, जितेंद्र आणि मनी यांच्यात भांडण झाले. कारण जितेंद्र मनीची प्रेयसी लखविंदर कौरबद्दल उलटसुलट बोलला होते. मनीला हे अजिबात सहन झाले नाही आणि त्याने जितेंद्रला मारण्याचा कट रचला. सध्या पोलीस मनी आणि त्याच्या प्रेयसीची चौकशी करत आहेत. सोबत तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.