JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मोठी बातमी! पाकिस्तानात लपलेल्या दाऊदच्या मुसक्या आवळण्याची तयारी; NIA टीम दुबईला पोहोचली

मोठी बातमी! पाकिस्तानात लपलेल्या दाऊदच्या मुसक्या आवळण्याची तयारी; NIA टीम दुबईला पोहोचली

NIA Action Against Dawood Ibrahim: एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे.

जाहिरात

NIA टीम दुबईला पोहोचली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 25 फेब्रुवारी : मुंबईसह देशाला हादरवणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाण्याची शक्यता आहे. एका मोठ्या कारवाईत, केंद्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि विदेशातील त्याच्या डी कंपनीवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पाच सदस्यीय तपास अधिकारी पथक दुबईला पाठवले आहे. दुबईच्या स्थानिक प्रशासनासह ही टीम त्यांना डी कंपनीबद्दल सांगेल आणि दुबईत राहून दुबईतूनच भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अशा दहशतवादी आणि गँगस्टरवर कारवाई करण्याचे आवाहन करेल. एनआयए मुख्यालयाच्या सूत्रांनी सांगितले, की कोणते अधिकारी दुबईला गेले आहेत, त्यांची नावे सांगता येणार नाहीत. मात्र, हे निश्चित आहे की, डी कंपनीवर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर आम्ही बरेच महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर आम्ही अनेक आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. यासोबतच या प्रकरणी अनेक आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र, पुढील कारवाई सुरू असून गरज भासल्यास तपास यंत्रणा परदेशी तपास यंत्रणेचीही मदत घेऊ शकते, त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. वाचा - हत्यारे घेऊन जाणारी टोळी जेरबंद, धुळ्यात तब्बल 12 तलवारी जप्त, तर 10 जण जेरबंद डी कंपनीशी संबंधित आरोपींविरुद्ध 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या वर्षी 2022 मध्ये, केंद्रीय तपास एजन्सी NIA ने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि इतर अनेक आरोपींविरुद्ध UAPA कायद्यांतर्गत (Unlawful Activities Prevention Act) गुन्हा दाखल केला होता. एनआयएची तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीविरुद्ध तपास करत असून येत्या काही दिवसांत त्याच्याशी संबंधित आरोपींवरही मोठी कारवाई करणार आहे.

पाकिस्तानात लपला आहे दाऊद? एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला होता. तेथूनच दाऊद इब्राहिम आणि त्याची अंडरवर्ल्ड कंपनी दहशतवाद आणि ड्रग्सच्या व्यापारात गुंतलेली असून भारतविरोधी कारवाया करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्देश जारी करून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. मुंबई हल्ल्याशी संबंधित प्रकरणाचा तपासही केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) नोंदवला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबईसह अनेक ठिकाणाहून अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या बेकायदेशीरपणे मिळवलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या