मुंबई, 4 ऑगस्ट : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूटला अटक केली आहे. विशेष म्हणजे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या डी कंपनीशी संबंधित व्यवहार प्रकरणाच्या आरोपांप्रकरणी एनआयएने सलीम फ्रुटची चौकशी केली होती. पण एनआयएने यावेळी सलीमला अटक करण्यामागील कारण वेगळं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशीने मुंबईतील एका नामांकित बिल्डरला धमकी दिली होती. सलीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसच्या नावाने धमकी दिली होती. तसेच त्याने बिल्डरकडे त्याच्या सुरु असलेल्या एका प्रोजेक्टमधील दोन फ्लॅटची डिमांड केलेली होती. संबंधित नामांकित बिल्डरने घाबरुन सलीमची ती मागणी पूर्ण केली होती. बिल्डरने आपल्या सुरु असलेल्या प्रोजेक्टमधून दोन फ्लॅट सलीमला दिले होते. पण त्यानंतर सलीमची आणखी हिंमत वाढली. त्याने पुन्हा बिल्डरला धमकी देण्यास सुरुवात केली. तो बिल्डरकडे संबंधित प्रोजेक्टमध्ये आर्धी पार्टनर्शीप मागू लागला. तो बिल्डरला यासाठी प्रचंड त्रास देत होता. ( भाजपला तरी काय नावं ठेवणार? ED च्या कारवाईवरून भुजबळांचा गुगली ) अखेर एनआयएला याबाबतची माहिती मिळाली. विशेष म्हणजे एनआयएने त्याआधीच सलीम कुरैशी याच्याविरोधात डी कंपनीशी संबंधित आणि त्याच्या काळ्या कूकृत्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाच्या तपासानंतर एनआयएने सलीमला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली.