निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 28 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता नंदुरबारमध्ये सुद्दा शेतकऱ्याने शेतीमध्ये अफूची शेती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 10 लाख किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावालगत असणाऱ्या एका शेतात छापा टाकून या ठिकाणी केली जाणारी अफूची शेती उद्ध्वस्त केली आहे. स्थानिक महसुल अधिकारी आणि पोलिसांनी पथक तयार करुन या शेतात घेतल्या जाणाऱ्या अफूची पिकं उपटून जमा केली आहे. ‘या’ 20 आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना 1 मार्चपासून मिळणार कोरोनाची लस, वाचा यादी जवळपास दोन शेतात मक्यांच्या पिकामध्ये लपवून अफूची शेती केली जात होती. पोलिसांना या दोन शेतातून जवळपास ट्रॅक्टरभर अफूची बोंडं असलेली रोपं जप्त केली. रात्री उशीरापर्यंत नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन मध्ये दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एकतर पोलीस पाटलांच्या वडिलांचे शेत असून या साऱ्या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर धनगर नामक संशयित आरोपीला अटक केली असून आणखीन एक आरोपी फरार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमची नामुश्की टाळण्यासाठी BCCI करणार ‘ही’ युक्ती या सर्व कारवाईमध्ये अंदाजे 10 लाख किंमतीची पाचशे किलोंच्या जवळपास अफूच्या ३ गोण्या भरेल एवढी झाडं पोलिसांनी जप्त केली आहे. नंदुरबार तालुक्यात अशा पद्धतीने अफुची शेती केली जात होती. याबद्दल आता सर्वस्तरावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस स्टेशनच्या या संयुक्त कारवाईबाबत कौतुक देखील होत आहे. तीन दिवसांपूर्वीच मालेगावातही आढळली अफूची शेती! दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका शेतावर धाड टाकून अफूची शेती उद्ध्वस्त केली होती. यावेळी पोलिसांनी सुमारे 50 लाख रुपये किंमतीचे तब्बल एक हजार किलो अफूची बोंडं जप्त केली. या प्रकरणी 3 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. संजय राठोड आजच राजीनामा देण्याची शक्यता, राऊतांचेही सूचक ट्वीट ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाने सापळा रचून मालेगावच्या घाणेगाव येथे धाड टाकून 32 गुंठ्यावर लागवड करण्यात आलेली अफूची शेती उद्ध्वस्त केली. एका शेतात अफूची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार, पोलीस निरिक्षक देविदास ढुमणे,उपनिरिक्षक पाटील, मोरे व इतर बारा जणांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळून आली. पोलिसांनी सर्व झाडे व बोंडे जप्त करून त्याचे मोजमाप केले असता त्याचे वजन एक हजार किलो भरले. बाजारात अफूच्या या बोडांची किंमत 50 लाखांपर्यंत असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.