JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सेल्फीकरता बुरखा हटवाल तर... मुस्लीम संघटनांचा महिलांविरोधात अजब फतवा

सेल्फीकरता बुरखा हटवाल तर... मुस्लीम संघटनांचा महिलांविरोधात अजब फतवा

हा गट स्वतःला मुस्लिम हक्कांचे रक्षक म्हणून समजतो. या ग्रुपमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढून सेल्फी घेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. पोलीस हा मेसेज कोठून आला याचा शोध घेत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 मे : मुस्लीम डिफेन्स फोर्स 24/7 नावाच्या संघटनेने मुस्लीम महिलांना सेल्फी काढण्यावरून धमकी दिली आहे. बुरखा न घालणाऱ्या आणि बुरखा काढून सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्या मुस्लीम महिलांवर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी संघटनेने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हा गट स्वतःला मुस्लीम हक्कांचे रक्षक समजतो. या ग्रुपमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढून सेल्फी घेऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी बुरखा न घालणाऱ्या मुस्लीम महिलांवर हल्ला केला जाईल, अशी धमकी या संघटनेने दिली आहे. सीपी शशी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ते या ग्रुपवर सतत लक्ष ठेवून आहेत. हा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्टाग्राम आणि फेसबुकशिवाय व्हॉट्सअॅपवरही हा संदेश लोकांना दिला जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही संघटना मुस्लीम महिलांना धार्मिक परंपरा मोडण्यापासून रोखणं हे त्यांचं कर्तव्य आहे, असं सांगून स्वतःला मुस्लीम हक्कांचे रक्षक असल्याचे सांगत आहे. हे वाचा -  घातपाताचा कट फसला; हरियाणातून 4 दहशतवाद्यांना अटक, समोर आलं महाराष्ट्र कनेक्शन मंगळुरू पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या संघटनेनं लोकांना धमकावले आहे आणि म्हटले आहे की, कुठेही मुस्लीम महिला बुरखा न घालता दिसली तर त्या महिलेला धडा शिकवू. पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, त्यांची टीम सातत्याने या टोळीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, हे लोक कोण आहेत? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे या ग्रुपमधील काही सदस्यांची माहिती आहे, मात्र प्रत्यक्षात हा मेसेज कुठून आला आणि त्याचा मास्टरमाईंड कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या