मराठी बातम्या /बातम्या /देश /घातपाताचा कट फसला; हरियाणात स्फोटकांसह चार दहशतवाद्यांना अटक; महाराष्ट्र कनेक्शन समोर

घातपाताचा कट फसला; हरियाणात स्फोटकांसह चार दहशतवाद्यांना अटक; महाराष्ट्र कनेक्शन समोर

हरियाणा पोलिसांना (Haryana Police) मोठं यश मिळाले आहे. हरियाणाच्या करनाल (Haryana's Karnal district)जिल्ह्यातून पोलिसांनी 4 संशयित दहशतवाद्यांना (terrorists) अटक केली आहे.

हरियाणा पोलिसांना (Haryana Police) मोठं यश मिळाले आहे. हरियाणाच्या करनाल (Haryana's Karnal district)जिल्ह्यातून पोलिसांनी 4 संशयित दहशतवाद्यांना (terrorists) अटक केली आहे.

हरियाणा पोलिसांना (Haryana Police) मोठं यश मिळाले आहे. हरियाणाच्या करनाल (Haryana's Karnal district)जिल्ह्यातून पोलिसांनी 4 संशयित दहशतवाद्यांना (terrorists) अटक केली आहे.

करनाल, 05 मे: हरियाणा पोलिसांना (Haryana Police) मोठं यश मिळाले आहे. हरियाणाच्या करनाल (Haryana's Karnal district)जिल्ह्यातून पोलिसांनी 4 संशयित दहशतवाद्यांना (terrorists) अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडर घेऊन जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली गनपावडर आरडीएक्स (RDX) असू शकते. सध्या पोलिसांची अनेक पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवाद्यांचा अनेक ठिकाणी मोठ्या घटना घडवून आणण्याचा प्लान होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 संशयित दहशतवाद्यांकडून गनपावडर, गोळ्या, शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी पहाटे 4 वाजता बसताडा टोल प्लाझा येथून सर्वांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण इनोव्हा गाडीतून जात होते. मधुबन पोलीस स्टेशनचे बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी आहे. प्राथमिक तपासात हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे निष्पन्न झाले असून आयबीच्या अहवालावरून नाकाबंदी करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

संशयित दहशतवाद्यांचं महाराष्ट्र कनेक्शन

करनाचे एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितलं की, चार तरुणांना अटक करण्यात आली असून हे चौघेही पंजाबचे रहिवासी आहेत. हा दारूगोळा ड्रोनद्वारे फिरोजपूरला पाठवण्यात आला असून आरोपींमध्ये गुरप्रीत, परमिंदर, अमनदीप आणि भूपेंद्र यांचा समावेश आहे. हे चौघे फिरोजपूरहून महाराष्ट्रातील नांदेडला स्फोटकं घेऊन जात असल्याची माहिती आतापर्यंत मिळाली आहे. या चौघांचेही बब्बर खालसाशी संबंध आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे वय सुमारे 20 ते 25 वर्षे आहे.

हे चारही दहशतवादी पंजाबचे रहिवासी

एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितलं की, दहशतवादी हरविंदर सिंग रिंडानं दहशतवाद्यांना आदेश दिले होते. पाकिस्तानातून दहशतवाद्यांना लोकेशन पाठवण्यात आलं होतं. या चार दहशतवाद्यांना तेलंगणाला IED पाठवायचं होतं. यापूर्वी दोन ठिकाणी IED चा पुरवठा करण्यात आला आहे. मधुबन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास ACP इंद्री करणार आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, 31 जिवंत काडतुसे, 3 लोखंडी कंटेनर आणि 1 लाख 30 हजार रुपये जप्त केले आहेत. तीन दहशतवादी फिरोजपूरचे रहिवासी आहेत. त्याचवेळी एक दहशतवादी लुधियानाचा रहिवासी आहे.

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गुप्तचर विभाग, पंजाब पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. रोबोटच्या मदतीने संशयितांच्या कारची तपासणी करण्यात आली. त्यात आणखी स्फोटके असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Haryana, Terrorist