JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पुन्हा तुरुंगात पाठवा! जामीनावर सुटलेल्या कैद्याची कैफियत, कारण आहे Serious

पुन्हा तुरुंगात पाठवा! जामीनावर सुटलेल्या कैद्याची कैफियत, कारण आहे Serious

आपली जामीनावर झालेली सुटका रद्द करावी आणि पुन्हा आपल्याला तुरुंगात पाठवावं, अशी विनंती एका कैद्यानं न्यायालयात केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 2 फेब्रुवारी: तुरुंगात (Jail) गंभीर गुन्ह्याची (Serious Crime) शिक्षा (Punishment) भोगणाऱ्या एका कैद्याला (Criminal) काही दिवसांच्या सुट्टीसाठी जामीनावर (Bail) सोडण्यात आलं आहे. मात्र बाहेर आल्यावर काही दिवसांतच त्याला पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे. खून आणि दरोड्याच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असणाऱ्या या आरोपीला बाहेरच्या जगात ना नोकरी मिळतेय, ना पुरेसं अन्न. त्याची तब्येत बिघडल्यावर त्याचा उपचार मिळणंदेखील कठीण झालं आहे.   बाहेरच्या जगातील आव्हानं तमिळनाडूत खून आणि दरोड्याची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याची नोव्हेंबर महिन्यात जामीनावर सुटका झाली. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपलं जगणं कठीण झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याला कुणीही काम द्यायला तयार नाही. त्याला भाड्याने घर देण्यासही कुणी तयार नाही. त्यामुळे राहायचं कुठे, असा प्रश्न त्याला पडला आहे. हॉटेलमध्ये राहण्याएवढे पैसे त्याच्याकडे नाहीत आणि कुणी घरही देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.   आरोग्याचीही समस्या गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत बिघडली आहे, मात्र उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आपला जामीन रद्द करून आपली रवानगी पुन्हा तुरुंगातच करण्यात यावी, असा अर्ज त्याने न्यायालयात केला आहे. येत्या गुरुवारी त्याच्या अर्जावर सुनावणी होणार असून त्यानंतर त्याची तुरुंगात पाठवण्याची मागणी मान्य होते की फेटाळली जाते, याचा फैसला होणार आहे.   हे वाचा -

खुनाचा आरोपी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या एका बंगल्यावर दरोडा टाकण्याचा गुन्हा त्याने केला होता. त्यावेळी तिथे असणाऱ्या सुरक्षारक्षकाचा त्याने खून केला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र बाहेरची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यापेक्षा तुरुंगातील आयुष्यच बरं, असं त्याला वाटू लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या