JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / गोणीत ठेवला हुमेजानचा मृतदेह, सलमानला अटक केल्यावर उलगडलं सत्य, मुंब्रा पोलीसही चक्रावले

गोणीत ठेवला हुमेजानचा मृतदेह, सलमानला अटक केल्यावर उलगडलं सत्य, मुंब्रा पोलीसही चक्रावले

ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे प्लास्टिक गोणीत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे.

जाहिरात

मुंब्र्यांतल्या हत्येचा पोलिसांकडून उलगडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विनोद राय, प्रतिनिधी ठाणे, 14 जून : ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे प्लास्टिक गोणीत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मुंब्रा पोलिसांनी मृत महिलेच्या पती आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीलगत 27 मे 2023 रोजी एका प्लॅस्टिकच्या गोणीत सेलोटेपच्या सहाय्याने बेडशीट मध्ये गुंडाळालेला सडलेल्या अवस्थेतला मृतदेह मिळाला होता, यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. बँक मॅनेजरच्या पत्नीची 6व्या मजल्यावरून उडी, 2 वर्षांपूर्वी झालं लग्न, चिठ्ठीत लिहिलं… पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करत अत्यंत क्लिष्ट अशा या हत्येचा उलगडा केला आहे. मुंब्रा पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस स्थानकात बेपत्ता महिलांबद्दलची माहिती घेत या प्रकरणाचा छडा लावला. Cctv च्या आधारे तिथून जाणाऱ्या शेकडो गाड्यांपैकी एक टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला. तोच धागा पकडून पोलिसांनी आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार नवाब याला पश्चिम बंगाल येथील मुर्शीदाबाद येथून ताब्यात घेतले. आरोपींच्या तपासात मृत महिलेचा पती सलमान हा आपली पत्नी हुमेजान उर्फ मुन्नी हिच्या चरित्र्यावर सतत संशय घेत होता ज्यातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अखेर २७ मे रोजी सलमान याने आपला साथीदार नवाब याच्या मदतीने आपल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह बेडशीट मध्ये गुंडाळून गोणीत भरला. यानंतर सेलोटेपने मृतदेहाला गुंडाळून मुंब्रा रेतीबंदर येथे टाकले. दोन्ही आरोपीना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वेटरला ATM कार्ड दिलं आणि त्यानेच घात केला, पोलीसही नेपाळपर्यंत पोहोचले आणि…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या