JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Mumbai Crime : देशी कट्टा, 2 कार घेऊन मुंबईत कांड करायला आला, पण समोर होते पोलीस, पुढे काय घडलं?

Mumbai Crime : देशी कट्टा, 2 कार घेऊन मुंबईत कांड करायला आला, पण समोर होते पोलीस, पुढे काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या कुप्रसिद्ध दरोडेखोराला मुंबईतील कांदिवली भागातून अटक करण्यात आली आहे.

जाहिरात

उत्तर प्रदेशहून मुंबईत मोठा कांड करायला आला, पण पोलिसांनी सापळा रचला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 24 जुलै : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या कुप्रसिद्ध दरोडेखोराला मुंबईतील कांदिवली भागातून अटक करण्यात आली आहे. दरोड्याची मोठी घटना घडण्याआधीच पोलिसांनी सतर्क होऊन आरोपीला अटक केली आहे. फरहान हनीफ कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. फरहान उत्तर प्रदेशच्या मेरठचा रहिवासी आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मेरठहून मुंबईमध्ये दरोडा टाकण्यासाठी आला होता. तो मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होता तेव्हाच पोलिसांना याबाबतचा सुगावा लागला. दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांना फरहानला देशी कट्टा, जिवंत काडतुसं, दोन कार आणि एका ऍक्टिव्हासह अटक केली आहे. ‘मांस खाणार नाही, गंगा स्नान करणार’, सचिनसोबत राहण्यासाठी सीमाचा नवा ड्रामा आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या दोन्ही कार आणि एक ऍक्टिव्हा चोरीची असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या दोन्ही गाड्या आरोपीने दिल्लीतून चोरल्याचं सांगितलं. दोन्ही गाड्यांवर मुंबईतील इतर वाहनांची डुप्लिकेट नंबर प्लेट लाऊन तो लुटीसाठी रेकी करत होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून तो दरोडा टाकण्यासाठी गाडीचा वापर करणार होता, असं फरहानने पोलिसांना तपासामध्ये सांगितलं आहे. दीड वर्ष मुंबईच्या तुरुंगात राहिल्यानंतर आरोपीने आधी मेरठला जाऊन तिथून देशी कट्टा विकत घेतला, नंतर दिल्लीत जाऊन त्याने कार चोरली आणि मग तो मुंबईत आला, पण दरोडा टाकण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली. याआधी 2020 सालीही आरोपीने समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करून दरोडा टाकला होता, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. ‘अंगात येतो नागोबा, सापाचं विष टाकतो पिऊन’ भोंदूबाबाच्या स्टिंग ऑपरेशनचा VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या