सरस्वतीचा खुनी मनोज साने
मुंबई, 11 जून : ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरातील आकाशदीप सोसायटीच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्य यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मनोज सानेने सरस्वतीची हत्या करून तिच्या मृतदेहाची इतक्या निर्दयतेने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला की त्याच्या शेजारी राहणारे लोकही घाबरले. आरोपी मनोज साने कोणाशीही बोलत नव्हता आणि इथे अनोळखी माणसासारखा राहत होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची माहितीही समोर येत आहे. मनोज साने याच्या मालमत्तेबाबत ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, ‘मनोज हा अनाथ आहे. असे असूनही, तो 2BHK फ्लॅटचा मालक आहे, ज्याची किंमत कोट्यावधी आहे. या फ्लॅटचे त्याला महिन्याला 40 हजार रुपये भाडे मिळत होते.’ यासोबतच मनोजला दारूचे व्यसन होते आणि तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या या कृत्यांमुळे त्याच्या दुकानाची कमाई कमी होत होती. या कारणावरून त्याने दुकानही बंद केले होते. मृतदेहाचा दुर्गंधी कमी करण्यासाठी परफ्यूमचा वापर मनोज साने याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर लोकांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने त्याच्यावरील संशय वाढला. फ्लॅट क्रमांक 701 मध्ये त्याच्या शेजारी राहणाऱ्या रुचिरा म्हणाल्या, ‘5 जूनपासून दुर्गंधी येत होती. यापूर्वी 704 वाले दार उघडत नव्हते. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस तेथे पोहोचताच मृतदेह कुजल्याची दुर्गंधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा उघडल्यावर मनोज परफ्युम फवारत होता. वाचा - Online Mobile Games : मोबाईलवरून धर्मांतराचं पाकिस्तान कनेक्शन? अटक केलेल्या आरोपीचा धक्कादायक खुलासा जोडपे कधीच कोणाशी बोलत नसत लोकांनी सांगितले की सरस्वती नेहमी घरात राहायची आणि मनोज बाहेर जायचा. दोघांनाही कधी कोणाशी बोलताना पाहिले नाही. त्यांच्या घरात एसी-कूलर आणि फ्रीज नव्हते. दिवाळी, होळी अशा सणांनाही या दोघांनी कधीच दार उघडले नाही. त्यांनी घराबाहेर दिवाही ठेवला नाही, त्यामुळे आम्ही कधीच प्रश्न विचारला नाही. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात पूर्णपणे गुंतले आहेत. सरस्वतीला दिला वेदनादायक मृत्यू 7 जून रोजी मुंबईपासून 40 किमी अंतरावर असलेल्या ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरातील आकाशदीप सोसायटीतील फ्लॅट क्रमांक-704 अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर सर्वांच्या नजरा या घटनेकडे लागल्या होत्या. येथे राहणाऱ्या 56 वर्षीय मनोज साने याने सर्वप्रथम आपली 32 वर्षीय कथित पत्नी सरस्वती वैद्य हिची हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाचे 100 हून अधिक छोटे तुकडे करण्यात आले. यासाठी कटर मशीनचा वापर करण्यात आला. हे तुकडे कुकरमध्ये शिवजून, गॅसवर भाजून नंतर त्या तीन कुत्र्यांना खायला द्यायचा, ज्यांच्यावर त्याच्या पत्नीचे खूप प्रेम होते.